NPS Vatsalya Scheme | केंद्रातील मोदी सरकारने आता लहान मुलांसाठी देखील एक महत्वाची स्कीम आणली आहे. मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारनं ‘एनपीएस वात्सल्य’ योजना (NPS Vatsalya Scheme) सुरु केली आहे. या योजनेत पालकांना आपल्या पाल्याच्या उत्तर आयुष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तिवेतन खातेही उघडता येणार आहे.
जुलै 2024 मध्ये ही योजना सरकारने आणली. यामुळे आता पालकांना आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षीत करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे. 18 सप्टेंबरपासून या योजनेची सुरुवात झाली आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प 2024 दरम्यान याबाबत घोषणा केली होती. मुले मोठी होतील तेव्हा त्यांच्याकडे पैसा असावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये नेमकं कोण गुंतवणूक करू शकते?, NPS वात्सल्य योजनेमध्ये किमान आणि कमाल किती गुंतवणूक करता येईल? NPS वात्सल्य कोण चालवू शकतं? तसेच मूल 18 वर्षांचे झाल्यावरही NPS वात्सल्य योजना चालू ठेवता येईल का? , या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात दिली आहेत.
योजनेसाठी गुंतवणूक किती करता येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, एनपीएस वात्सल्यमध्ये 4 गुंतवणुकीचे पर्याय देण्यात आले आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला दरवर्षी किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. जास्त गुंतवणूक करायची असेल तर हवे तेवढे पैसे देखील गुंतवता येतात.
मुलाला वयाची 18 वर्ष पूर्ण होताच या खात्याचे रुपांतर नियमीत पेन्शन योजनेत होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे. मुलाच्या नावावर जमा केलेल्या पैशातून तुम्हाला काही पैसे काढायचे असतील तर यासाठी तुम्हाला गुंतवणुकीच्या तारखेपासून 3 वर्षे वाट बघवी लागेल. त्यानंतर तुम्ही त्यातून 25 टक्के पैसे काढू शकता.मूल 18 वर्षांचे होईपर्यंत तुम्ही हे तीन वेळा करू शकता. (NPS Vatsalya Scheme)
NPS Vatsalya Scheme साठी कुणाला खाते उघडता येणार?
ज्या मुलांचं वय 18 वर्षांखाली आहे, त्यांचे एनपीएस वात्सल्य खाते उघडू शकता. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आपोआप नियमित ‘एनपीएस’ खात्यात रूपांतरित होईल. पुढे वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यातून निवृत्तिवेतन (पेन्शन) मिळेल. गुंतवणुकीतून अनुक्रमे 14 टक्के, 9.1 टक्के आणि 8.8 टक्के परतावा मिळेल. (NPS Vatsalya Scheme)
योजनेच्या अटी काय?
18 वर्षापर्यंतची सर्व मुले या योजनेसाठी पात्र असतील.
खाते फक्त मुलांच्या नावाने उघडली जातील, मुलेच या योजनेचे लाभार्थी असतील
सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडामध्ये खाते उघडती येईल किंवा ई-एनपीएसद्वारे देखील तुम्ही खाते उघडू शकता.
खाते उघडण्याची कमीत कमी मर्यादा ही 1000 रुपये असणार आहे.
योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही
खात्यात जमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज मिळेल
तीन वर्षानंतर 25 टक्के रक्कम शिक्षण, आजार यासाठी काढता येणार
मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल
मुल 18 वर्षाचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही. (NPS Vatsalya Scheme)
News Title : NPS Vatsalya Scheme
महत्वाच्या बातम्या –
आजचा गुरुवारचा दिवस शुभ की अशुभ?, वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
3 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉल, इंटरनेट; ‘या’ कंपनीने लाँच केला भन्नाट प्लॅन
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सविस्तर
‘या’ दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहता येणार सिनेमा; असं बुक करा तिकीट
निधी मिळत नसल्याने शिंदे गटातील नेत्यानी विष घेत उचललं टोकाचं पाऊल, पुढे काय घडलं






