Traffic Police Scheme | दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना एक अनोखी संधी दिली आहे. आता ट्रॅफिक पोलिसांबरोबरच सामान्य नागरिकही वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवून ‘Prahari’ अॅपद्वारे ट्रॅफिक चालान पाठवू शकणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक यशस्वी चालानवर बक्षीस मिळणार आहे आणि तेही दरमहा 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत!
‘Prahari’ अॅपद्वारे कमाईची नवी संधी :
या योजनेचा भाग होण्यासाठी नागरिकांनी Google Play Store वरून ‘Prahari’ अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांकाने OTP व्हेरिफिकेशन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्ही अधिकृतपणे नियमभंग नोंदवू शकता.
कोणताही ट्रॅफिक नियम मोडणारा (जसे की: सिग्नल तोडणं, हेल्मेट न वापरणं, चुकीचं पार्किंग) पाहिल्यास त्याचा स्पष्ट फोटो, वेळ, ठिकाण आणि उल्लंघनाचा तपशील भरून अॅपवर अपलोड करायचा आहे.
Traffic Police Scheme | दर महिन्याला बक्षिसांची रँकिंग यादी :
योजना अंतर्गत दर महिन्याला एक रँकिंग जाहीर केली जाते:
पहिला क्रमांक: ₹50,000
दुसरा क्रमांक: ₹25,000
तिसरा क्रमांक: ₹15,000
चौथा क्रमांक: ₹10,000
फोटो व्हेरिफिकेशननंतरच मिळणार बक्षीस :
चालान फोटो मिळाल्यानंतर ट्रॅफिक पोलीस त्याची वैधता तपासतात. केवळ योग्य आणि स्पष्ट माहिती असलेल्या नोंदींनाच मान्यता दिली जाते. त्यामुळे सूडबुद्धीने किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांना यातून कोणताही फायदा मिळणार नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर या योजनेचे प्रचंड स्वागत होत आहे. अनेक नागरिकांनी याला कमाईचं नवं साधन म्हटलं आहे. अनेकांनी यातून हजारो रुपये कमावल्याचंही सांगितलं आहे. तसेच या योजनेमुळे शहरात ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं सोपं झालं आहे. नागरिक आता स्वतः वाहतूक सुरक्षेचे रक्षक बनत असून यामुळे नियमांचे पालन वाढले आहे.






