नोव्हेंबरमध्ये ‘या’ ५ राशींवर धनवर्षाव होणार, भाग्याचा तारा उजळणार

On: October 25, 2025 3:25 PM
November 2025 Horoscope
---Advertisement---

November 2025 Horoscope | नोव्हेंबर 2025 हा महिना ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत विशेष मानला जातो आहे. कारण या महिन्यात एकाच वेळी तीन महत्त्वाचे ग्रह सूर्य, बुध आणि शुक्र — राशी परिवर्तन करणार आहेत. या ग्रहांच्या हालचालीचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर दिसणार असला तरी, काही राशींसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. सुख, संपत्ती, कीर्ती आणि आत्मविश्वासाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. (November 2025 Horoscope)

वैदिक ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो आणि त्याचा प्रभाव मानवजीवनावर तसेच पृथ्वीवरील घटनांवर होतो. या वेळी सूर्यदेव 16 नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहेत, बुध ग्रह 23 नोव्हेंबरला तूळ राशीत जाणार आहे, तर शुक्र ग्रह 2 नोव्हेंबरला कन्या राशीतून तूळ राशीत संक्रमण करेल. या तीन ग्रहांच्या एकत्रित हालचालीमुळे चार राशींना अपार लाभ मिळणार आहे.

मेष, वृश्चिक, तूळ आणि मकर राशींना लाभदायक काळ :

नोव्हेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी शुभवार्तांचा काळ ठरणार आहे. आत्मविश्वास वाढेल, जुन्या मित्रांशी भेट होईल आणि अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. कामात यश, नवनवीन संधी आणि कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील. (November 2025 Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास आणि आर्थिक स्थैर्याचा काळ आहे. परदेश प्रवासाची संधी, व्यवसायातील अडथळे दूर होणे आणि धार्मिक कार्यात सहभाग यामुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे.

November 2025 Horoscope | तूळ, मकर आणि कुंभ राशींना भाग्याचा हात :

तूळ राशीच्या लोकांसाठी ग्रहांची साथ अनुकूल आहे. विवाहयोग्य व्यक्तींना शुभ संकेत मिळतील आणि व्यावसायिक भागीदारीत नवे यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि तणाव कमी होईल.

मकर राशीच्या लोकांना या महिन्यात आर्थिक आणि सामाजिक दोन्ही क्षेत्रात प्रगती दिसून येईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता असून पद-प्रतिष्ठा वाढेल. नवे घर, वाहन किंवा मालमत्तेचे सौख्यही लाभू शकते.

कुंभ राशीसाठी नोव्हेंबर महिना शुभारंभाचा काळ ठरणार आहे. मुलांच्या प्रगतीचा आनंद मिळेल, मानसिक शांती लाभेल आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे. धार्मिक प्रवासाची संधीही संभवते.

News Title: November 2025 Planetary Transits: Sun, Mercury, and Venus Bring Prosperity for Aries, Libra, Scorpio, Capricorn & Aquarius

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now