Astrology | नोव्हेंबर महिना सुरू होताच ग्रहांचा मोठा फेरबदल सुरू झाला आहे. वैदिक ज्योतिषानुसार या महिन्यात एकूण सहा प्रमुख ग्रहांचं संक्रमण होत आहे. यात सूर्य, शनी, मंगळ, गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा समावेश आहे. या संक्रमणामुळे काही राशींसाठी अनुकूल काळ तर काहींसाठी सावधानतेचा काळ निर्माण झाला आहे. (Astrology Tips)
या महिन्याच्या सुरुवातीला शुक्र आणि मंगळ ग्रहांच्या हालचालींनी प्रभाव दाखवला आहे. शुक्र ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत गेला असून 26 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या परिवर्तनामुळे मेष आणि मिथुन राशींसाठी करिअरमध्ये चांगले परिणाम दिसतील, तर वृषभ आणि मीन राशींनी आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल.
सूर्य आणि मंगळ ग्रहांच्या संक्रमणाचा प्रभाव :
सूर्य ग्रह 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या बदलामुळे कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभकारक राहील. त्यांच्या प्रतिष्ठा आणि पदवृद्धीचे योग निर्माण होतील. मात्र, मेष आणि धनु राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
मंगळ ग्रह 1 नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत अस्त राहणार आहे. या काळात कर्क, वृश्चिक आणि मीन राशींसाठी लाभदायी परिणाम मिळतील, तर वृषभ आणि मिथुन राशींना आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात संयम ठेवून निर्णय घेणं आवश्यक आहे.
Astrology | गुरु, बुध आणि शनीच्या हालचालींनी निर्माण होणार अनुकूल योग :
गुरु ग्रह 11 नोव्हेंबर रोजी वक्री होणार आहे. या काळात कर्क, मकर आणि मीन राशींना शिक्षण, संपत्ती आणि कुटुंबिक जीवनात सकारात्मक परिणाम दिसतील. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीत प्रगती शोधणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. (Astrology Tips)
बुध ग्रह या महिन्यात तब्बल पाच वेळा आपली स्थिती बदलणार आहे. मेष, तूळ आणि धनु राशींना याचा विशेष लाभ मिळणार आहे. संवादकौशल्य वाढेल, नवीन संधी मिळतील आणि व्यावसायिक निर्णयांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाला अनुकूल करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप फायदेशीर ठरेल.
शनी ग्रहाची मार्गी चाल आणि जीवनातील स्थिरता :
नोव्हेंबरच्या अखेरीस, 28 नोव्हेंबर रोजी शनी ग्रह मार्गी चालणार आहे. या चालीनंतर जीवनात स्थैर्य येईल आणि जुन्या अडचणी दूर होतील. वृषभ, कर्क आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष शुभ आहे. करिअरमध्ये स्थैर्य, आर्थिक लाभ आणि मानसिक शांतता लाभेल.
शनी चालीसाचं पठण केल्यास शनी ग्रहाच्या प्रभावाला अनुकूलता मिळते असं ज्योतिष सांगतात. या महासंक्रमणाच्या काळात सर्वांनी संयम, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं आहे.






