पोलिसांनी छापा टाकला, 500 तरुणी अन्… पाहून पोलीस सुद्धा हादरले!

On: March 31, 2025 6:36 PM
MLA Devyani Pharande Raids Nashik Cafe Over Immoral Activities
---Advertisement---

Crime News | पैसा कमावण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचे एक धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातील नोएडा (Noida) शहरात समोर आले आहे. येथे एका नवरा-बायकोने मिळून शेकडो तरुणींकडून आक्षेपार्ह व्हिडिओ आणि वेबकॅम शो तयार करून ते परदेशी वेबसाइट्सना विकण्याचा गोरखधंदा चालवला होता. अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate – ED) केलेल्या एका छाप्यात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून, या जोडप्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे.

कंपनीच्या नावाखाली अश्लील व्हिडीओंचा धंदा?

या जोडप्याने सबडिजी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (Subdigi Ventures Pvt Ltd) नावाची एक कंपनी नोंदणीकृत केली होती. कागदोपत्री ही कंपनी जाहिरात, मार्केटिंग रिसर्च आणि ओपिनियन पोलशी संबंधित काम करत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, या कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्षात वेगळाच व्यवसाय सुरू होता. ईडीला या कंपनीमार्फत परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (FEMA) उल्लंघन होत असल्याचा संशय होता, त्यामुळे त्यांनी कंपनीच्या कार्यालयावर आणि संबंधित घरांवर छापा टाकला.

छाप्यादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. घरामध्ये शेकडो तरुणी उपस्थित होत्या, ज्या कथितरित्या मॉडेल म्हणून काम करत होत्या. मॉडेलिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींना हे जोडपे सोशल मीडियावरील जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यांना पैशांचे आमिष दाखवून आक्षेपार्ह व्हिडिओ आणि वेबकॅम शो करण्यास भाग पाडले जात होते. अंदाजे ५०० तरुणींना त्यांनी अशा प्रकारे कामावर ठेवल्याची माहिती आहे.

परदेशी कंपन्यांशी करार आणि कोट्यवधींची उलाढाल

या जोडप्याने तयार केलेले आक्षेपार्ह व्हिडिओ आणि वेबकॅम शो परदेशातील पॉर्न वेबसाइट्सना विकले जात होते. त्यांनी सायप्रस (Cyprus) येथील टेक्नियस लिमिटेड (Technius Limited) नावाच्या कंपनीसोबत करार केला होता. ही कंपनी एक्हॅम्सटर (XHamster) आणि स्ट्रिपचॅट (Stripchat) यांसारख्या प्रसिद्ध अश्लील वेबसाइट्स चालवते. हे जोडपे या कंपन्यांना व्हिडिओ विकून कोट्यवधी रुपये कमावत होते. या कमाईतील केवळ २५ टक्के हिस्सा ते मॉडेल म्हणून काम करणाऱ्या तरुणींना देत असत.

ईडीच्या तपासात असे आढळून आले आहे की, सबडिजी कंपनी आणि तिच्या संचालकांच्या बँक खात्यांमध्ये परदेशातून तब्बल १५.६६ कोटी रुपये जमा झाले होते. याशिवाय, नेदरलँड्समधूनही (Netherlands) एका खात्यात ७ कोटी रुपये पाठवण्यात आले होते. आतापर्यंत एकूण २२ कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. हे पैसे आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डांच्या माध्यमातून रोख स्वरूपात काढण्यात आले आहेत. ईडीने या छाप्यात घरातून ८ लाख रुपयांची रोकडही जप्त केली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now