वाहनधारकांनो लक्ष द्या! ‘हे’ कागदपत्र नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

On: September 10, 2025 5:03 PM
Today Petrol Diesel Price
---Advertisement---

No PUC No Fuel | महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने “नो पीयूसी… नो फ्युएल” हा उपक्रम कठोरपणे लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अंतर्गत, वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसलेल्या कोणत्याही वाहनाला पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार नाही. (No PUC No Fuel)

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनांसाठी वेळेवर PUC प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक ठरणार आहे.

कशी होणार अंमलबजावणी? :

या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तांत्रिक पद्धतींचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांचा क्रमांक स्कॅन केला जाईल. त्यानंतर स्कॅन केलेल्या क्रमांकावरून वाहनाचे PUC प्रमाणपत्र वैध आहे की नाही, हे तपासले जाईल.

जर वाहनाचे प्रमाणपत्र वैध नसेल, तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. मात्र, वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी त्याच पंपावर तात्काळ PUC काढण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी (UID) दिली जाईल, ज्यामुळे त्याची वैधता तपासणे सोपे होईल.

No PUC No Fuel | अवैध प्रमाणपत्रांवर धडक कारवाई :

बैठकीत अवैध मार्गाने PUC प्रमाणपत्रे देणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर अंकुश येणार असून, प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

याशिवाय भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम्स आणि गॅरेजेसमध्येही PUC प्रमाणपत्र मिळवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे वैध प्रमाणपत्र असणे सुनिश्चित होईल. (Pollution Control Certificate)

प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल :

महाराष्ट्रात वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत “नो PUC… नो फ्युएल” उपक्रम प्रदूषण नियंत्रणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या निर्णयामुळे नागरिकांनी वेळोवेळी आपले वाहन तपासून वैध प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक ठरणार आहे. (No PUC No Fuel)

पर्यावरणाच्या दृष्टीने हे पाऊल कितपत परिणामकारक ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सरकारच्या या आदेशामुळे वाहनधारकांमध्ये हलकासा तणाव जाणवत असला तरी दीर्घकाळासाठी हे पाऊल सर्वांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

News Title : No PUC, No Fuel: Maharashtra govt’s big decision to curb pollution, fuel only for vehicles with valid certificates

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now