नागरिकांनो सावध राहा! ई-चलनाच्या नावाखाली तुमची होऊ शकते फसवणूक

On: December 6, 2025 5:21 PM
E-Challan News
---Advertisement---

E-Challan News | राज्यात 13 डिसेंबर रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीबाबत (Lok Adalat) नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. विशेषतः ई-चलान प्रकरणांवरील दंडात मोठी सवलत मिळणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत होत्या. मात्र या सर्व अफवांना आता वाहतूक विभागाने स्पष्टपणे फाटा दिला आहे. मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने महत्त्वाचे विधान करत सांगितले की, लोकअदालतीमध्ये ई-चलानची कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. (E-Challan News)

मागील काही दिवसांपासून यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर ई-चलान दंडात मोठी सवलत मिळणार असल्याच्या संदेशांचा पाऊस पडत होता. यामुळे अनेक वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र वाहतूक विभागाने आता परिस्थिती स्पष्ट करत सांगितले आहे की, 13 डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांसाठी कोणतीही विशेष सवलत देण्याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ई-चलान सवलतीच्या अफवा खोट्या :

वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ई-चलान तडजोड प्रकरणांवर 2021 पासून राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मान्यतेने प्रक्रिया सुरू आहे, मात्र ती लोकअदालतीशी संबंधित नाही. काही यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया पेजेसवर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीकडे नागरिकांनी अधिक अलर्ट राहावे, असेही वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.(Lok Adalat)

तसेच अनधिकृत लिंक, फॉर्म किंवा अॅपच्या माध्यमातून ई-चलान रक्कम भरणा करू नका, असेही आवाहन करण्यात आले आहे. चुकीच्या लिंकवर पेमेंट केल्यास नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे ई-चलान पेमेंट करताना केवळ अधिकृत सरकारी पोर्टल किंवा वाहतूक विभागाच्या वेबसाइटचाच वापर करावा.

E-Challan News | गैरसमज दूर करण्यासाठी स्पष्ट सूचना :

जर एखाद्या नागरिकाचे प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी ठेवले असेल, तर त्याबाबतची माहिती थेट न्यायालय किंवा स्थानिक वाहतूक पोलीसांकडूनच घेणे आवश्यक आहे. चुकीच्या व्हिडिओंमध्ये किंवा पोस्ट्समध्ये दिलेल्या माहितीकडे दुर्लक्ष करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस अधीक्षक सुनील भारव्दाज यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात ही सर्व माहिती देण्यात आली आहे. (E-Challan News)

वाहतूक विभागाने नागरिकांना हेही लक्षात करून दिले की, ई-चलान संबंधित सर्व अधिकृत माहिती राज्य पोलीस विभाग, वाहतूक पोलीस किंवा सरकारी संकेतस्थळावरूनच जाहीर केली जाते. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत माध्यमातून आलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ नका.

News Title: No E-Challan Settlement in Lok Adalat on December 13: Police Clarifies Rumors

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now