लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘त्या’ निकषांबाबत महत्वाची माहिती समोर

On: December 12, 2024 12:44 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki bahin yojana | महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे’ 2100 रुपये कधी मिळणार, याची राज्यभरातील महिलांना प्रतीक्षा लागली आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून योजनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.योजनेचे निकष बदलण्यात आले, कागदपत्रांची पडताळणी होणार, अशा विविध चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहेत. याबाबत आता अधिकृत माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. (Ladki bahin yojana)

आदिती तटकरे यांनी योजनेसंदर्भात एक ट्वीट करत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन राज्यातील महिलांना केलं आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

आदिती तटकरे यांचं ट्वीट काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.

एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती, असं ट्वीट आदिती तटकरे यांनी केलं आहे. यामुळे लाडक्या बहीणींना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी तटकरे यांनी एक परिपत्रक देखील पोस्ट केले आहे. (Ladki bahin yojana)

योजनेच्या कोणत्याही अटी-शर्ती बदलल्या नाहीत-

या परिपत्रकात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल, असं म्हटलं आहे. म्हणजेच योजनेत सध्या कोणतेही बदल झाले नाहीत. (Ladki bahin yojana)

News Title –  No change in Ladki bahin yojana terms and conditions

महत्त्वाच्या बातम्या-

मंत्रीमंडळ विस्तारापूर्वीच दोन्ही पवारांची दिल्लीत भेट, नव्या राजकीय समिकरणांची नांदी?

सर्वात मोठी बातमी! अजित पवार शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीत मोठी खलबतं?

काका शरद पवारांना अजितदादांकडून वाढदिवशी खास शुभेच्छा; म्हणाले…

सत्तेची गणितं फिरली तशी सोन्यानेही रंग बदलले; गेल्या 5 वर्षांत ‘असे’ वाढले भाव

कुणाला संधी तर कुणाचा पत्ता कट?, फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरली

Join WhatsApp Group

Join Now