राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, स्टार खेळाडू आयपीएल 2025 मधून बाहेर

On: May 8, 2025 12:15 PM
Rajasthan Royals
---Advertisement---

Rajasthan Royals | आयपीएल 2025 हंगाम राजस्थान रॉयल्ससाठी निराशाजनक ठरला आहे. प्लेऑफची शर्यत गमावलेल्या संघासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. संघाचा महत्त्वाचा फलंदाज नितीश राणा दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता राजस्थानला लीग टप्प्यात केवळ दोन सामने खेळायचे असून, हे सामने राणाशिवाय खेळावे लागणार आहेत. (Rajasthan Royals)

लुआन-ड्रे प्रिटोरियसला संधी, राजस्थान नवव्या स्थानावर :

नितीश राणाने (Nitish Rana) आपला शेवटचा सामना 1 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला होता. त्यानंतर 4 मे रोजी कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. या सामन्यात राजस्थानला एका धावेने पराभव पत्करावा लागला. यंदाच्या हंगामात राणाने 11 सामन्यांत 21.70 च्या सरासरीने आणि 161.94 च्या स्ट्राईक रेटने 217 धावा केल्या आहेत.

नितीश राणाच्या (Nitish rana) अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दक्षिण आफ्रिकेचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज लुआन-ड्रे प्रिटोरियसला संघात समाविष्ट केलं आहे. या 19 वर्षीय खेळाडूने 33 टी-20 सामन्यांत 911 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 97 असून, तो आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. राजस्थानने त्याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात घेतलं आहे.

Rajasthan Royals | राजस्थानचा गोंधळलेला हंगाम :

प्रिटोरियसने SA20 लीगमध्ये पार्ल रॉयल्सकडून (Rajasthan Royals) पदार्पण करत 12 सामन्यांत 397 धावा केल्या होत्या. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे हॅम्पशायर काउंटीने फेब्रुवारी 2025 मध्ये त्याच्याशी करार केला होता. आता त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची मोठी संधी मिळाली आहे.

राजस्थान रॉयल्स सध्या पॉइंट्स टेबलमध्ये 6 गुणांसह 9 व्या स्थानावर आहे. 12 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले असून, उर्वरित सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्लेऑफची संधी संपली असली तरी उर्वरित 2 सामने जिंकून संघ आपल्या हंगामाचा शेवट सकारात्मक करण्याचा प्रयत्न करेल.

News Title: IPL 2025: Nitish Rana Ruled Out of Tournament Due to Injury, RR Signs Lhuan-dre Pretorius as Replacement

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now