मोठी बातमी! नितीन राऊत यांच्या कारचा भीषण अपघात, प्रचारावरून परततानाच..

On: November 14, 2024 9:14 AM
Nitin raut Car Accident 
---Advertisement---

Nitin raut | काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊत यांच्या कारचा अपघात झाला आहे. त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात नितीन राऊतांना कोणतीही दुखापत झाली नाही. या प्रकरणी कपिलनगर परिसरात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Nitin raut )

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत हे काल रात्री प्रचार सभा आटपून घरी जात होते. त्यावेळी नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकात त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात घडला.

नितीन राऊत थोडक्यात बचावले

या घटनेची माहिती मिळताच नितीन राऊत यांच्या समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली. समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपुस करण्यात आली. या अपघातात नितीन राऊत हे थोडक्यात बचावले आहेत. ते एकदम सुखरूप असून कारला धडक देणाऱ्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. (Nitin raut )

दरम्यान, उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. येथे काँग्रेस नेते व विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपचे डॉ. मिलींद माने, बसपचे मनोज सांगोळे, वंचितचे अशोक वाघमारे, खोरिपचे चंद्रकांत रामटेके व अपक्ष अतुल खोब्रागडे यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात आहेत.

News Title –  Nitin raut Car Accident

महत्त्वाच्या बातम्या-

“सर्वांनी मिळून माझा लोकसभेत पराभव केला”; नवनीत राणांचं महायुतीलाच आव्हान

“स्वतःला मर्द समजणाऱ्या ठाकरेंच्या बॅगमध्ये लिपस्टिक-लाली..”; नितेश राणेंची खोचक टीका

आज वैकुंठ चतुर्दशी, श्रीहरी व महादेवाची कृपादृष्टी कुणावर असणार?; वाचा राशीभविष्य

अभिषेकसोबत अफेरच्या चर्चांवर निम्रत कौर अखेर बोलली, व्हिडीओ तूफान व्हायरल

घटस्फोटाच्या 3 वर्षांनंतर समंथाचा मोठा खुलासा, म्हणाली…

Join WhatsApp Group

Join Now