“मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, तेव्हा..”; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

On: October 7, 2024 11:28 AM
Nitin Gadkari statement in discussion
---Advertisement---

Nitin Gadkari | भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रचलित आहेत. अशातच त्यांचं एक विधान चर्चेत आलंय.रविवारी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी एक अत्यंत मोठा खुलासा केलाय. मी पूर्वी नक्षलवादी चळवळीत होतो, असं गडकरी म्हणाले आहेत. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला. (Nitin Gadkari)

नेमकं काय म्हणाले गडकरी?

“त्यावेळी डॉ. अलेक्झांडर हे राज्याचे राज्यपाल होते. त्यावेळी मी आणि राजदूत दुचाकीवरुन मेळघाटातील गावांमध्ये फिरलो. तेथील रस्ते अत्यंत खराब होते. तरीही वनखात्याचे अधिकारी रस्ते बांधायचे काम करुन देत नव्हते. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुनावले. कितीतरी लहान मुले कुपोषणाने मरत आहेत, तुम्हाला काही वाटत कसे नाही? तुम्ही रस्ते बांधायला परवानगी का देत नाही?, असा सवाल मनोहर जोशींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना केला”, अशी आठवण गडकरी यांनी सांगितली. (Nitin Gadkari)

“यानंतर मी मनोहर जोशी यांना म्हटलं की, तुम्ही हा विषय माझ्यावर सोडून द्या, मी बघतो काय करायचंय ते. त्यावेळी मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो. मी चुकून राजकारणात आलो. आता मी पुन्हा नक्षलवादी चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही. यानंतर मेळघाटातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले.”, असं गडकरी म्हणाले.

“एखाद्याने फाईल दाबून धरली की..”

तसंच पुढे ते म्हणाले की, “सरकारी कामात एखाद्या अधिकाऱ्याला शिक्षा करायची असली की ते फार कठीण काम आहे. कारण एखाद्याने ती फाईल दाबून धरली की ती फाईल वर जात नाही.”, असंही गडकरी म्हणाले. चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही म्हणजे सरकार, असं गडकरी यांनी म्हटलं. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलंय. (Nitin Gadkari)

दरम्यान, गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील मागे भाष्य केलं होतं. “गुंतवणूकदारांना त्यांच्या अनुदानाचे पैसे वेळेवर मिळतील का याची अजिबात खात्री नाही. कारण सध्या सरकारला लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा लागतोय.”, असं गडकरी म्हणाले होते. गडकरी आपल्या परखड मतांसाठी प्रचलित आहेत. आता त्यांनी सांगितलेला एक जुना किस्सा चर्चेत आलाय.

News Title –  Nitin Gadkari statement in discussion

महत्त्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, नेमकी काय झाली घोषणा ?

“शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी स्वत:ची पोरं काॅन्व्हेन्टमध्ये..”; किरण माने यांची पोस्ट चर्चेत

शिंदे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ नेत्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

ऐन दिवाळीत शनीची वक्री चाल, ‘या’ 3 राशींचे सुरू होणार अच्छे दिन!

‘बिग बॉस’चा विजेता सुरज चव्हाणला बक्षीस म्हणून मिळाला 14 लाखांचा चेक अन्ं बरंच काही

Join WhatsApp Group

Join Now