सरकार म्हणजे विषकन्या; भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

On: September 30, 2024 4:14 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच सर्वत्र राजकीय वारे फिरू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सर्वच नेतेमंडळींची वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीला फार कमी कालावशी शिल्लक राहिल्यामुळं राजकीय नेतेमंडळी देखील त्यांचं मतं विविध कार्यक्रमात मांडताना दिसत आहेत.

सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या भरवशावर अजिबात राहू नका :

राजकीय वर्तुळात नेत्यांची वक्तव्य हे केंद्रस्थानी असतात. अशातच सध्या याच राजकीय चर्चांच्या वर्तुळात सध्या समोर नितीन गडकरी यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राजकीय पक्षांबाबत एक विधान केलं आहे. या विधानाची सर्वत्र सर्वत्र चर्चा होत आहे.

यावेळी नितीन गडकरी म्हणले की, ‘सरकार कोणत्याही पक्षाचं असो मात्र त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण, सरकार म्हणजे विषकन्या असते’ असं मोठं आणि खळबळजनक विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या भरवशावर अजिबात राहू नका असा सल्लाही त्यांनी उद्योजकांना दिला आहे.

Maharashtra l गडकरींच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा :

भाजपचे जेष्ठ नेते नागपूरमधील विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काऊन्सिलच्यावतीने मध्य भारतातील पर्यटनावर आधारित असलेल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नितीन गडकरी यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.

नितीन गडकरी हे त्यांच्या रोखठोक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच गडकरी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देऊन लक्ष वेधलं आहे. याशिवाय तर नेतेमंडळी देखील या गडकरींच्या भाष्यावर त्यांचं मत मांडत आहे.

News Title- Nitin gadkari big statment on goverment

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, 42 जखमी तीन गंभीर

पवारांची बारामती हादरली! ‘या’ नामांकित कॉलेजमध्ये चाकू खुपसून विद्यार्थ्याचा खून

अजितदादांची स्मार्ट खेळी! फोनद्वारे केला पहिला उमेदवार जाहीर

सर्वात मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार?

भाजपला धक्क्यावर धक्के, आणखी एक बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now