Nitin Gadkari | भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रचलित आहेत. गेल्या काही दिवसांपासून गडकरी आपल्या अशाच थेट विधानामुळे चर्चेत आहेत. शनिवारीच त्यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात एक विधान केलं होतं ज्याची चांगलीच चर्चा झाली. राजाने टीका सहन केली पाहिजे आणि त्यावर विचार केला पाहिजे, असं ते म्हणाले होते. आता त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंबाबत एक विधान केलंय, जे चर्चेत आलंय. नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते.
नागपूर येथे मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार काल 22 सप्टेंबररोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बोलताना गडकरी यांनी रामदास आठवले हे राजकारणातले हवामान तज्ज्ञ आहेत, असं म्हटलं.
नेमकं काय म्हणाले गडकरी?
“आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही पण, रामदास आठवले यांना ते पुन्हा मंत्री होण्याची पूर्ण गॅरंटी आहे. सरकार कुणाचंही येऊ दे , तरीही रामदास आठवले यांचं मंत्रिपद पक्कं आहे. आठवले राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांना हवा कुठल्या दिशेने चालते आहे याचा अंदाज येतो. लालूप्रसाद यादव देखील रामविलास पासवान यांच्याबद्दल तसंच म्हणायचे”, असं गडकरी Nitin Gadkariम्हणाले.
तसंच पुढे ते म्हणाले की, “मी आठवलेंना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आणि निरोगी जीवन प्राप्त व्हावं. अशी आपणा सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो. मला विश्वास आहे की, त्यांचं आयुष्य त्यांनी दलित, पीडित आणि शोषित माणसांसाठी दिलेलं आहे. या माध्यमातून ते सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यात यशस्वी होतील.”
रामदास आठवले काय म्हणाले?
या कार्यक्रमात आठवले यांनी देखील भाषण केलं. “जो संविधान मानत नाही, त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. कायद्यात बदल किंवा दुरुस्ती म्हणजे संविधान बदलणे नाही. तसंच मनोज जरांगेंची मागणी ही रास्त मागणी आहे. मात्र राज्याला हा अधिकार नाही. त्यामुळे मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग तयार करता येईल का यावर विचार व्हावा.”, असं रामदास आठवले म्हणाले. (Nitin Gadkari)
News Title : nitin gadkari big statement on ramdas athawale
महत्वाच्या बातम्या –
आज ‘या’ राशींवर राहणार महादेवाची कृपा; सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण!
MMS व्हिडीओनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ तूफान व्हायरल!
शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा, भरसभेत दिलं आश्वासन
भडकलेल्या वसंत मोरेंनी थेट हातोडा चालवला, नेमकं काय घडलं?
‘शाहिद कपूरशिवाय मी…’; 17 वर्षांनी करिनाने ब्रेकअपबद्दल केला मोठा खुलासा






