नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

On: August 28, 2024 10:02 AM
Vehicle Horn Policy
---Advertisement---

Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वात मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या भारत मंडपममध्ये नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली SIAM च्या सीईओ स्तराची एक बैठक पार पडली.यात वाहन उद्योगातील अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. (Nitin Gadkari )

या बैठकीमध्ये प्रामुख्याने जुने वाहन भंगारात काढल्यास नवीन वाहनावर सवलत देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याला कंपन्यांनी देखील होकार दिला आहे. भंगारात काढलेल्या जुन्या मोटारींचे तपशील ‘वाहन’ संकेतस्थळावर दिले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना अतिरिक्त सवलत देखील मिळणार आहे.

भंगारात काढलेल्या वाहनाच्या बदल्यात नवीन वाहनांवर सवलत

याचाच अर्थ आता, जुने वाहन भंगारात काढल्यानंतर नवीन वाहनाच्या किमतीवर दीड ते तीन टक्के सवलत खरेदीदारांना मिळणार आहे. यासाठी प्रवासी व वाणिज्य वाहनांच्या निर्मात्यांनी होकार दर्शवला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर कंपन्यांनी ही भूमिका जाहीर केली.

यानंतर वाणिज्य वाहननिर्मिती कंपन्यांनी जुन्या भंगारात काढलेल्या वाहनाच्या बदल्यात नवीन वाहनाच्या खरेदीवर 3 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. यात टाटा मोटर्स, व्होल्व्हो, आयशर कमर्शियल व्हेईकल्स, अशोल लेलँड, महिंद्र अँड महिंद्र, फोर्स मोटर्स, इसुझू मोटर्स आणि एसएमएल इसुझू या कंपन्या 3.5 टन क्षमतेपेक्षा अधिकच्या वाहनांवर सवलत देणार आहेत.(Nitin Gadkari )

नवीन कार विकत घेणाऱ्यांना मिळणार मोठं डिस्काऊंट

याचबरोबर बस आणि व्हॅनवर देखील अशाच प्रकारची सवलत मिळणार आहे. कंपन्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही सवलत देणार आहे. नवीन वाहनाच्या खरेदीवर सवलत मिळाल्यास अधिकाधिक ग्राहक त्यांच्या जुनी वाहने भंगारात काढतील, असा सरकारचा यामागे विचार आहे. यामुळे रस्त्यांवर सुरक्षित, कमी प्रदूषण करणारी वाहने धावतील.(Nitin Gadkari )

दरम्यान, मर्सिडीज बेंझने जुनी मोटार भंगारात काढली असल्यास नवीन मोटारीच्या खरेदीवर 25 हजार रुपये सवलत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच, कंपनीकडून देण्यात येणाऱ्या इतर सवलतीही ग्राहकाला मिळतील. यामुळे वाहन खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

News Title – Nitin Gadkari announcement for new vehicles

महत्त्वाच्या बातम्या-

कुठे ओसरणार तर कुठे बरसणार?, पावसाबाबत IMD कडून महत्वाची अपडेट

फडणवीसांना मोठा झटका, ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

आज ‘या’ 3 राशींचा दिवस वरदानासारखा, सर्व इच्छा पूर्ण होतील!

चित्रपटाची ॲाफर आणि हॅाटेलमध्ये नेऊन… अभिनेत्रीच्या आरोपांनी इंडस्ट्री हादरली

आता तुम्ही परत आमदार नाहीत!, भाजप नेत्याने भाजप आमदाराला सुनावल्याने पक्षात खळबळ

Join WhatsApp Group

Join Now