‘मुलांना सांता नाही संत बनवा’, नितेश राणेंचं ट्वीट चर्चेत

On: December 24, 2024 9:01 AM
Nitesh Rane
---Advertisement---

Nitesh Rane | ख्रिसमस हा सण संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. उद्या 25 डिसेंबररोजी हा उत्सव साजरा केला जाईल. अनेक शाळेत तसंच जगभरात लहान मुलं या दिवशी सांताक्लॉजच्या वेशात धम्माल मस्ती करतात. भारतात देखील अनेक इंग्रजी माध्यम शाळांना ख्रिसमसच्या विशेष सुट्ट्या देखील दिल्या जातात. मात्र, याला आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आक्षेप घेतलाय. त्यांनी मुलांना सांताक्लॉज बनवण्याला विरोध केलाय.

ख्रिसमसच्या काळात काँन्व्हेंट शाळांमध्ये लहान मुलांना सांताक्लॉज बनवलं जातं. पण हीच गोष्ट मंत्री नितेश राणे यांना खटकली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट देखील केलंय. मुलांना सँन्ता नाही तर संत बनवा अशी पोस्ट नितेश राणे यांनी केलीये. त्यांच्या या पोस्टची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नितेश राणे यांचं ट्वीट-

‘आपल्या मुलाला सांता नाही तर संत बनवा! एक जागृत संस्कृतीशी एकनिष्ठ हिंदू …सकल हिंदू समाज’ अशा आशयाची पोस्ट नितेश राणे यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) केली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनेकांनी त्यांच्या पोस्टवर टीका करणाऱ्या कमेंट करत त्यांच्या भूमिकेला विरोध केलाय. ‘आपल्या मुलांना आधी संत बनवा, आपल्या घरापासून त्याची सुरुवात करा’ अशी कमेन्ट करत एका नेटकऱ्याने नितेश राणे यांना टोला लगावला. तर विरोधकांनीही नितेश राणेंचा समाचार घेतला.

विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक धर्माचे, पंथाचे लोक राहतात. त्यामुळे शाळेत देखील सर्व सण-उत्सव साजरे केले जातात. मुलांना त्याची माहिती व्हावी हा उद्देश त्यामागे असतो. तसेच सर्वांनी मिळून एकमेकांच्या भावनांचा आणि संस्कृतीचा आदर करावा, ही त्यामागील भावना असते. मात्र, नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सँता नाही तर संत बनवा असं म्हणत याला विरोध केलाय. त्यांचं हे ट्वीट आता चर्चेत आलंय.

News Title – Nitesh Rane tweet on Christmas

महत्त्वाच्या बातम्या-

“तुझाही संतोष देशमुख केला जाईल”; सत्ताधारी आमदाराच्या पुतण्यांना थेट धमकी

मुंडेंना पक्षातूनच मोठा धक्का, राष्ट्रवादीचा नेता अजित पवारांना म्हणाला ‘बंदोबस्त करून…’

इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा, आज ग्रहमान ‘या’ राशींना देणार साथ!

‘छगन भुजबळांबद्दल अजित पवारांनीच मला…’, देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा!

विनोद कांबळींची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

Join WhatsApp Group

Join Now