‘बंदोबस्त करणार’! मंत्री होताच नितेश राणेंनी दिला इशारा?

On: December 24, 2024 2:56 PM
Nitesh Rane
---Advertisement---

Nitesh Rane l कणकवली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मत्स्य आणि बंदर खात्याची मोठी जबाबदारी मिळाली आहे. मात्र आता नितेश राणे मंत्री होताच त्यांनी रोहींग्यो आणि बांगलादेशी यांना थेट इशारा दिला आहे.

विकासाच्या अनुषंगाने बदल करणार :

नितेश राणे यांनी आज मत्स्य आणि बंदर खात्याचा पदभार स्वीकारला आहे. मंत्री राणे यांना नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, “दोन्ही खात्यांमध्ये काय सुरु आहे? तसेच नेमकी सुरवात कुठून करायची? याचा मी आढावा घेतला आहे”. तसेच “माझ्या काही अपेक्षा किंवा विकासाच्या अनुषंगाने बदल करण्यासाठी नेमके काय करता येईल, यासाठी मी काही सूचना दिल्या असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत”.

याशिवाय सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे 26/11 नंतर आपण यासंदर्भात मोठी खबरदारी देखील घेतली आहे. मात्र अद्यापही काही जिहादी लोकांच्या एक्टिव्हिटी सागरी किनाऱ्यावर काम करत असतात. मात्र आता त्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.

Nitesh Rane l नितेश राणेंचा थेट इशारा :

दरम्यान, “रोहींग्यो आणि बांगलादेशी यांचं वास्तव्य आम्ही सहन करणार नाही. तसेच त्यांना सोडणार देखील नाही. तसेच आता त्यांची सफाई मोहीम हाती घेऊ. त्यामुळे समुद्री किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचा देखील लवकरच बंदोबस्त करणार” असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

मात्र आता आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते रोहींग्यो आणि बांगलादेशी यांचं वास्तव्य सहन करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच आमदार नितेश राणे हे बंदोबस्त करणार असल्याचं म्हंटल आहे.

News Title – nitesh rane after taking charge of ministry warns rohingya & bangladeshi muslims

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसेनेच्या नेत्यांवर पुन्हा अन्याय! मोठं कारण आलं समोर

उद्धव ठाकरे अ‍ॅक्शनमोडवर! लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार?

बीडच्या ‘आका’बद्दल आमदार सुरेश धसांचा धक्कादायक खुलासा!

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता!

‘कोणत्या दुनियेत आहात धनूभाऊ?, काही सिरीयसनेस…’, सरपंच हत्येवर आमदार धस संतापले

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now