Nirmala Sitharaman | नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात गोरगरीब जनता, महिलांसाठी, विद्यार्थी, तरूण, रोजगार यांच्यासाठी अनेक योजनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक बिहार आणि आंध्र प्रदेश राज्याला भरघोस तरतूद देण्यात आली होती. यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. यामुळे विरोधकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांच्यावर जोरदार टीका केली होती.
अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातून विरोधी गटाने सर्वाधिक टीका केली. यालाच अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. एखाद्या राज्याचा अर्थसंकल्पात नाव घेतलं नसेल तर त्या राज्याला वगळण्यात आलं आहे असं नाही. ज्या राज्याचं नाव घेतलं नाही त्याचा अर्थ असा नाही की त्या राज्याला लाभ होत नाही, असं निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या आहेत.
निर्मला सीतारमन यांची प्रतिक्रिया
निर्मला सीतारमन म्हणाल्या की, केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचं नाव घेता येईलच असं नाही. जून महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाने वाढवण बंदराला मंजुरी दिली होती. या बंदरांसाठी तब्बल 76 हजार कोटीची मंजूरी दिली आहे. मात्र फेब्रुवारीमध्ये केलेल्या अंतरिम बजेटमध्ये त्याचा उल्लेख केला गेला नसल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही की महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जातंय, असं निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या आहेत.
“विरोधक अर्थसंकल्पाचा चुकीचा प्रचार करतात”
एखाद्या राज्याच्या नावाचा उल्लेख जर अर्थसंकल्पात झाला नसेल तर त्याला देखील अर्थसंकल्पात जाहीर होणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नाही, असं होत नाही. अर्थसंकल्पाचा लाभ हा सर्वच राज्यांना मिळतो. त्यामुळे विरोधक अर्थसंकल्पाचा चुकीचा प्रचार करत आहे, असं निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितलं आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 15 टक्के शुल्क कमी आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे आता सराफ बाजारात चैतन्याचं वातावरण आहे.
News Title – Nirmala Sitharaman First Reaction After Budget 2024
महत्त्वाच्या बातम्या
दिशा सालियनप्रकरणी ठाकरे पिता-पुत्राला फसवण्याचा डाव?, फडणवीसांचं नाव घेत अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
“दरेकरांनी कपाळावर कुंकू लावले तर सखू सारखे दिसतील”; जरांगे पाटील यांची टीका
“लग्न मोडलं, डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या…”, किरण गायकवाडने केला गौप्यस्फोट
रेल्वेमध्ये मेगा भरती! 7 हजारांपेक्षाही अधिक पदे भरली जाणार, ‘असा’ करा अर्ज
बालभारती पुस्तकातील ‘वन्समोअर’ शब्दावरून वाद; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण






