निलेश घायवळ परदेशात पळण्यामागे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा हात?, माजी गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

On: October 6, 2025 5:07 PM
Nilesh Ghaiwal
---Advertisement---

Nilesh Ghaiwal | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्याने राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता थेट राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सर्वप्रथम “पाटील यांच्या मदतीनेच घायवळ परदेशात पळाला” असा आरोप केला होता. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही हाच आरोप पुन्हा उचलून धरला आहे, ज्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

माजी गृहमंत्र्यांचा आरोप : सरकारने चौकशी करावी :

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सरकारवर टीका करत म्हटलं आहे की, “एका कुख्यात गुंडाला परदेशात पळून जाण्यासाठी मदत करणारे राजकीय हात कोणते हे उघड व्हायला हवे. जर चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्या आश्रयामुळे घायवळ पळाला असेल, तर ही गंभीर बाब आहे.”

देशमुख यांनी राज्य सरकारला या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असे स्पष्ट केले आहे. (Nilesh Ghaiwal Gang)

Nilesh Ghaiwal | सुप्रिया सुळे यांची चौकशीची मागणी :

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील याच मुद्यावर सरकारला घेरले आहे. त्यांनी म्हटलं की, “घायवळला क्लिअरन्स सर्टिफिकेट कोणी दिलं, त्याला बाहेर जाण्यासाठी परवानगी कोणी दिली आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यात हातभार लावला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे.” तसेच सुळे यांनी हे प्रकरण केवळ गुंडगिरीचे नसून राजकीय आश्रयाचे उदाहरण असल्याचा आरोप केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कार्यालयातील समीर पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हेगारी संबंध असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या चौकशीचे धागेदोरे आणखी गुंतागुंतीचे बनले आहेत. विरोधकांच्या मते, हे सर्व प्रकरण सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे, आणि प्रशासनावर चौकशीचा दबाव वाढवत आहे.

News Title: Gangster Nilesh Ghaywal escaped abroad with help of a big political leader; Ex-Home Minister Anil Deshmukh accuses Chandrakant Patil

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now