Nikki Tamboli l बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन अखेर शेवटच्या टप्पयात आला आहे. सध्या बिग बॉस मराठीमध्ये फॅमिली वीक सुरू आहे. या फॅमिली वीकमध्ये सर्व स्पर्धकांना भेटायला त्यांच्या घरासाठील सदस्य येत आहेत. अशातच आज बिग बॉसने आजच्या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आजच्या भागात दिसत आहे की, कायम कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असलेली निक्की तांबोळीची आई तिला भेटण्यासाठी घरात येणार आहे. त्यावेळी निक्कीच्या आईने एक मोठा खुलासा केला आहे , त्यामुळे निक्कीला धक्का बसला आहे.
निक्कीच्या आईने केला बिग बॉसच्या घरात मोठा खुलासा :
बिग बॉसच्या फॅमिली वीकमध्ये निक्की तांबोळीची आई घरात येताच तिने निक्कीसमोर एक धक्कादायक खुलासा केला आहे. या खुलास्यानंतर निक्कीला चांगलाच धक्का बसला आहे. यावेळी निक्कीची आई बिग बॉसच्या घरात आल्यानंतर तिने निक्कीला बाजूला घेऊन काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी समजावल्या आहेत.
त्यावेळी निक्कीच्या आईने बिग बॉमधून बाहेर पडलेला सदस्य अरबाज पटेल बद्दलही धक्कादायक माहिती निक्की सांगितली आहे. निक्कीची आई तिला म्हणाली की, ‘‘अरबाजने जे केलं ते अजिबातही बरोबर नाही. कारण तो तुझ्यासोबत खूप चुकीचा चालला आहे. त्याने असं बिलकुल करायला नको होतं. कारण त्याची एंगेजमेंट झाली आहे असं म्हणतात.’’ त्यावेळी आईच्या या वाक्यानंतर निक्कीला चांगलाच गुलीगत धोका मिळाला आहे. त्यावर नक्की तिच्या आईला विचारते की, ‘‘कोणाची झाली?’’ असं तिने पुन्हा विचारलं. त्यावर आई म्हणाली, ‘‘अरबाजची एंगेजमेंट झालेली आहे.’’
Nikki Tamboli l निक्कीला मिळाला गुलीगत धोका :
निक्कीच्या आईने केलेल्या या धक्कादायक खुलास्यानंतर निक्कीला चांगलाच धक्का बसला आहे. तसेच त्यावर निक्की बिग बॉसला सांगते की, ‘‘आता जर अरबाज घरात आला तर मी मेंटली पूणर्पणे पागल होईन. तसेच अरबाज आणि निक्की जे काही होतं ते इट्स ओव्हर.’’
त्यानंतर निक्की अरबाज पटेलच तिच्याकडे असलेलं सगळं सामान स्टोअर रुममध्ये जमा करते. त्यानंतर बिग बॉल सांगते की, ‘‘हे अरबाजचे कपडे आहेत, तर फेकून द्या,’’ तसेच अरबाजचा कॉफी कप देखील ती स्टोअर रुममध्ये ठेवते. त्यामुळे अरबाजचा खरा चेहरा निक्की समोर आल्यानंतर निक्की चांगलीच चिडली आहे.
News Title – Nikki Tamboli mother reveals big thing about arbaz patel tells he is engaged
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यात बड्या बापांच्या मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक अत्याचार
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेकडून धक्कादायक प्रकार, सगळीकडे एकच खळबळ!
कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन
उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड!
शेतकऱ्यांनो PM किसान योजनेचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!






