निक्की हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रील्स आणि ब्युटी पार्लरवरुन वाद, बेरोजगार प्रियकराने केला गेम

On: August 25, 2025 1:53 PM
Nikki Murder Case
---Advertisement---

Nikki Murder Case | ग्रेटर नोएडामध्ये निक्की पायला या 26 वर्षीय विवाहित तरुणीची तिच्या पतीने जिवंत जाळून हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी छळ होत असल्याचे आरोप या प्रकरणी होत असताना, पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. निक्की आणि तिचा पती विपिन भाटी यांच्यात रील्स बनवणे आणि ब्यूटी पार्लर चालवण्यावरून वाद होत होता. याच वादातून अखेरीस विपिनने निक्कीला निर्दयपणे मारहाण केली आणि तिला जिवंत जाळल्याचे उघड झाले आहे.

निक्कीची बहीण ठरली प्रत्यक्षदर्शी :

घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विपिनसह त्याची आई आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी पती विपिनचे पत्नीवर मारहाण करणारे व्हिडिओदेखील समोर आले आहेत, ज्यामुळे या हत्याकांडाची क्रूरता अधिक अधोरेखित झाली आहे. (Nikki Murder Case Greater Noida)

निक्कीची मोठी बहीण कंचन हिचेही लग्न याच घरात झाले असून ती या घटनेची प्रत्यक्षदर्शी आहे. तिच्या मते, 35 लाखांच्या हुंड्यासाठी दोन्ही बहिणींना सातत्याने त्रास दिला जात होता. निक्कीची हत्या होण्याच्या आधी एक दिवस तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या मुलासमोरच विपिनने पत्नीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जाळले, असा आरोप कंचनने केला आहे.

Nikki Murder Case | पार्लरसाठी दिलेले ८ लाख रुपयेही गेले वाया :

कंचनने सांगितले की, पार्लर व्यवसायामुळे घरात वाद व्हायचे. दोन्ही बहिणी मिळून पार्लर चालवत होत्या. मात्र, सासरच्या मंडळींना हे मान्य नव्हते. यामुळे वाद सतत वाढत होता आणि अखेर या प्रकरणाने जीव घेणारे रूप घेतले. (Nikki Murder Case Greater Noida)

निक्कीच्या भावाने सांगितले की, जवळपास दीड वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबाने निक्कीला पार्लर व्यवसायासाठी 8 लाख रुपये दिले होते. पण विपिन आणि त्याचा मोठा भाऊ दोघेही बेरोजगार होते. त्यामुळे त्यांनी पार्लरच्या कामात अडथळे आणले आणि यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठे नुकसानही केले. याच कारणामुळे निक्कीने पुन्हा पार्लर सुरू करण्याचा आग्रह धरला होता, पण यावरूनच वाद विकोपाला गेला आणि हत्येपर्यंत पोहोचला.

News Title : Nikki Murder Case Greater Noida: Beauty Parlour and Reels Dispute Leads to Shocking Killing by Husband Vipin Bhati

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now