लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्वाची माहिती समोर!

On: October 1, 2025 12:24 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक बोगस लाभार्थींनी घेतल्याचे समोर येत आहे, असे बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सरकारने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. योजनेचा आर्थिक भार तिजोरीवर प्रचंड वाढल्यामुळे महायुती सरकारने (Mahayuti Government) आता निकष कठोर केले आहेत. याचाच भाग म्हणून, राज्य सरकारने या योजनेसाठी अतिशय महत्त्वाचा नवा नियम लागू केला आहे. यामुळे योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. आता या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वार्षिक उत्पन्नाची पडताळणी :

लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थीसोबतच त्या महिलेचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न किती आहे, याचीही आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे. जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचे उत्पन्न शोधले जाणार आहे. लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.

लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावा, अशी मुख्य अट आहे. अनेक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे. मात्र लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे. (Ladki Bahin Scheme)

Ladki Bahin Yojana | उत्पन्नाची पडताळणी का? :

लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Annual Income) अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे, ही मुख्य अट आहे. याआधी केवळ लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यात आले होते. यात गृहिणी तसेच अनेक महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर नव्हते.

मात्र, अनेकदा कुटुंबाचे एकूण उत्पन्न जास्त असूनही केवळ महिलांचे उत्पन्न कमी दाखवून योजनेचा लाभ घेतला जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. हे टाळण्यासाठी आणि खऱ्या गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी, राज्य सरकारने आता कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले आहे.

ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल? :

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e-KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

यानंतर लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही, ते तपासण्यात येईल आणि जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल. जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

e-KYC पडताळणी करणे आवश्यक : 

जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल. यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.

त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि ‘माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत’ आणि ‘माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे’ हे प्रमाणित करावे लागेल. शेवटी तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश दिसेल.

News title : Ladki Bahin Yojana e-kyc Update

Join WhatsApp Group

Join Now