Sukanya Samriddhi Yojana | केंद्र सरकारकडून मुलींसाठी देशभरात सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते. भविष्यातील मुलींच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली. आता या योजनेसंबंधी केंद्रीय अर्थमंत्रालयाने अनेक नियमात बदल केले आहेत. या नवीन नियमाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. नवीन नियमाचे पालन केले नाही तर, तुमचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद होऊ शकते. (Sukanya Samriddhi Yojana)
.. तर खाते होऊ शकते बंद?
केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले नवीन नियम सर्व अल्प बचत खात्यावर लागू होणार आहेत. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाते असणाऱ्यांनीही हे बदलेले नियम लक्षात घेणे गरजेचे आहे.
बदललेल्या नियमानुसार, आजी-आजोबांनी उघडलेले सुकन्या समृद्धी योजनेचे खाते आता आई-वडील किंवा कायदेशीर पालकांच्या नावाने ट्रान्सफर केले जातील. तसेच जर दोन सुकन्या समृद्धी बँक खाते असेल तर ते खाते बंद होईल. असे खाते नियमविरोधी ठरवले जाईल.(Sukanya Samriddhi Yojana)
पॅन आणि आधार जोडणे आवश्यक-
मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक असलेल्यांच पॅन (PAN) आणि आधार कार्ड (Aadhaar) खात्याला जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर पॅन आणि आधार जोडणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
दरम्यान, सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येक महिन्याला 250 रुपयांपासूनत ते वर्षभरात 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येते. या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर 8.2 टक्के व्याज दिले जाते. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर खाते म्यॅच्यूअर होते.(Sukanya Samriddhi Yojana)
तसेच या खात्यातून मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 50 टक्के रक्कम काढता येते. या योजनेत खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र असणे गरेजेचे आहे. यासह अर्ज करणाऱ्या आई-वडील किंवा पालकाचे पॅन आणि आधार कार्डही लागते.
News Title : New rules in Sukanya Samriddhi Yojana
महत्वाच्या बातम्या –
आज अनंत चतुर्दशी, ‘या’ राशींवर राहणार गणपती बाप्पाची कृपा!
ईशा देओलकडून खुलासा म्हणाली, ‘सेक्सबदल मला….’
दीपिकाचा लेकीसोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
पितृ पक्षात ‘या’ गोष्टी करा; होतील सर्व इच्छा पूर्ण
…तर हा नेता महाविकास आघाडीच्या वळू- रेड्यांना चाबकाने फोडून काढणार






