New Gold Rate । पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. आपल्याकडे सणांना सर्वात जास्त सोनं खरेदी केलं जात आहे. आणि आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने नवीन पल्ला गाठला आहे. गेले दोन दिवस सोन्याचा भाव थोड्या प्रमानावर कमी झाला होता, परंतु आज मंगळवार १४ ऑक्टोबरला मात्र पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसत आहे. सोन्यासोबतच चांदीच्या भावातही बदल झाले आहेत. जाणून घ्या काय आहेत आजचे भाव
माहितीनुसार, आज १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ११३,७२६ रुपये एवढा आहे. आणि १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास १३१,५०० रुपये एवढा झाला आहे. सकाळी ही किंमत १२६,७३० होती. जवळपास २,८४० रुपयांची वाढ आज पाहायला मिळत आहे. त्याच बरोबर एक किलो चांदीचा भाव १६१,३७० झाला आहे. आणि १० ग्राम चांदीची किंमत १,६१४ आहे.
मुंबई – १० ग्राम २४ कॅरेट : १३१,५००
पुणे – १० ग्राम २४ कॅरेट : १३१,५००
नाशिक – १० ग्राम २४ कॅरेट : १३१,५००
नागपूर – १० ग्राम २४ कॅरेट : १३१,५००
जागतिक राजकारण आणि मोठ्या दगडामोडींचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होता आहे. सध्या सुरु असलेले रुस – युक्रेन युद्ध, अमेरिकन डॉलरची कमी होणारी किंमत आणि सोन्याच्या गुंतवणुकीत वाढलेला कल या सर्व गोष्टीचा परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. आज सोन्याचा भाव वाढला असून आता पुढे होईल याकडे लक्ष लागले आहे.






