तीन कार लाँच! दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा भन्नाट फीचर्ससह ‘या’ कार

On: October 2, 2024 5:33 PM
Useless Car Features
---Advertisement---

New Car Launch l सणासुदीचा सिझन सुरू झाल्याने ऑक्टोबरमध्ये अनेक नवीन गाड्या बाजारात लाँच होत आहेत. जर तुम्हीही सणासुदीच्या निमित्ताने नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज आपण या महिन्यात लाँच होणाऱ्या तीन नवीन गाड्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Kia EV9 :

Kia EV9 ही एक नवीन इलेक्ट्रिक SUV कार आहे, जी उद्या म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. या कारमध्ये तुम्हाला 99.8kWh बॅटरी पॅक मिळेल. तसेच या कारमध्ये ड्युअल मोटर सेटअप देखील असणार आहे. कारण ते ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) ची सुविधा प्रदान करेल. तसेच त्याची पॉवर 384hp आणि 700Nm टॉर्क असेल.

EV9 ही कार 6-सीटर लेआउटसह लाँच होणार आहे. ज्यामध्ये लेग सपोर्ट सारखी फीचर्स असणार आहेत. त्यामुळे हे CBU म्हणून देखील लाँच केले जाईल आणि या कारची किंमत सुमारे 1 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.

New Car Launch l या दोन कार होणार लाँच :

दुसरी कार Kia Carnival आहे, जी नवीन पिढीच्या मॉडेलसह आणली जात आहे. या कारचे मागील मॉडेल जून 2023 मध्ये बंद करण्यात आले होते. पण आता Kia ची नवीन कार आणखी लक्झरी फीचर्ससह येणार आहे. सुरुवातीला ते लिमोझिन आणि लिमोझिन प्लस या दोन ट्रिममध्ये लाँच केले जाईल. ही कार उद्या म्हणजेच 3 ऑक्टोबरला लाँच होणार आहे.

तिसरी कार Nissan Magnite Facelift आहे जी 4 ऑक्टोबर रोजी लाँच केली जाऊ शकते. निसान मॅग्नाइटच्या नवीन मॉडेलमध्ये नवीन फ्रंट ग्रिल आणि बंपर डिझाइन दिसेल. यासोबतच कारच्या हेडलाइट्समध्येही अनेक नवीन बदल पाहायला मिळतात. या निसान कारला सध्याच्या 1.0 लिटर पेट्रोल इंजिनमधून 72hp पॉवर आणि टर्बो इंजिनमधून 100hp पॉवर मिळेल.

News Title – New Car Launch In October Month

महत्वाच्या बातम्या-

चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! एमएस धोनीचे चाहते हैराण

‘या’ आजाराने वाढवलंय नागरिकांचं टेन्शन! अशी घ्या स्वतःची काळजी

बिग बॉसकडून सूरज चव्हाणवर अन्याय; आता थेट…

अभिनेता गोविंदाच्या हेल्थबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर!

दिवाळी गिफ्ट! फक्त 13 हजार रुपये भरा आणि iPhone 16 मिळवा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now