Nepal Violence 2025 | शेजारील नेपाळमध्ये गेल्या चार दिवसांपासून हिंसाचाराने थैमान घातलं आहे. सरकारने अचानक सोशल मीडियाच्या काही साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आंदोलन उफाळून आलं. विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि आंदोलकांनी थेट नेपाळचं संसद भवन पेटवलं. एवढंच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले झाले. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. (Nepal Violence 2025)
या पार्श्वभूमीवर एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंसाचाराचा फायदा घेत भारत-नेपाळ सीमेवरील विविध जेलमधून तब्बल 15,000 कैदी फरार झाले आहेत. यामुळे भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
60 कैद्यांना अटक :
सशस्त्र सीमा दलाने (SSB) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत सीमावर्ती भागातून एकूण 60 कैद्यांना पकडलं आहे. त्यांना संबंधित राज्यांच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातून 22, बिहारमधून 10 आणि पश्चिम बंगालमधून 3 कैद्यांना अटक करण्यात आली आहे. काही कैद्यांनी स्वतःला भारतीय नागरिक असल्याचा दावा केल्याने त्याचीही चौकशी सुरू आहे. (India Nepal Border Alert)
नेपाळ सरकारने देशातील काही लोकप्रिय सोशल मीडिया साइट्सवर बंदी आणली. या निर्णयाचा तीव्र विरोध होताच आंदोलन सुरू झालं. सुरुवातीला शांततेत सुरू झालेलं आंदोलन काही तासांतच हिंसक बनलं. आक्रमक आंदोलकांनी काठमांडूसह अनेक भागांत जाळपोळ केली. विद्यार्थी आणि तरुणांच्या सहभागामुळे आंदोलन अधिक तीव्र झालं.
Nepal Violence 2025 | भारतात हाय अलर्ट :
नेपाळच्या अस्थिर परिस्थितीमुळे भारत-नेपाळ सीमेवर सतत गस्त वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत. फरार कैद्यांपैकी काहीजण भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर गावागावात देखरेख आणि चौकशी मोहीम सुरू आहे. (Nepal Violence 2025)
नेपाळमधील हिंसाचारामुळे शेजारील भारतालाही धोका निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने कैदी फरार झाल्यामुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.






