गायिका नेहा कक्करचं लग्न मोडणार?, रोहनप्रीत सिंहपासून घेणार घटस्फोट?

On: September 25, 2024 1:07 PM
Neha Kakkar husband Rohanpreet Singh big revelation about divorce
---Advertisement---

Neha Kakkar | बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहात असते. मात्र, सध्या नेहा आणि रोहनप्रीत सिंह यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. दोघांनी 2020 मध्ये लग्न करत संसार थाटला. आता त्यांच्या लग्नाला जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आली आहेत. नेहा नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अशात नेहा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. (Neha Kakkar )

लग्नाला चार वर्ष पूर्ण झाल्यापासून नेहा आणि रोहनप्रीत यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. आता घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच नेहाचा पती रोहनप्रीत याने भाष्य केलं आहे. त्याने या सर्व चर्चेवर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

नेहा रोहनप्रीत सिंहला घटस्फोट देणार?

“मी आयुष्यात जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा माझ्या मनात खूप कृतज्ञतेची भावना असते. तोही एक दिवस होता आणि आजचाही दिवस आहे. मी आज इथे स्वतःला बघून खरोखरच धन्य मानतो. देवाच्या आशीर्वादामुळे आज मी या ठिकाणी पोहोचलो आहे.”, असं रोहनप्रीतने म्हटलं आहे.

तसंच, नेहा कक्करसोबत घटस्फोटाच्या अफवांवर देखील रोहनप्रीत व्यक्त झाला. “अफवा या एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायच्या असतात. कारण, अफवा या अफवाच असतात. उद्या कोणी काही बोलेल, परवा कोणी काहीही बोलेल, त्यामुळे या गोष्टींचा आपल्या वैयक्तिक संबंधांवर परिणाम होऊ देऊ नका. लोकांचे ते कामच आहे. त्यांना जे आवडते ते त्यांना करू द्या. पण, आपण आपलं आयुष्य आनंदी जगायला हवं.”, असं रोहनप्रीत म्हणाला आहे. (Neha Kakkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar)

रोहनप्रीत सिंहने घटस्फोटाच्या चर्चेवर सोडलं मौन

थोडक्यात काय तर, रोहनप्रीत याने नेहासोबत त्याचे नाते अजूनही घट्ट असून दोघेही सुखी संसार करत असल्याचे संकेत दिले आहेत. नेहा आणि त्याच्यामध्ये काहीही वाद नाहीये. काही दिवसांपूर्वीच नेहा कक्कर हिने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले. नेहाने पती रोहनप्रीतसोबतचे खास फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यातून दोघांत कोणतेही वाद नसून ते आनंदी जीवन जगत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा या अफवा ठरल्या आहेत. (Neha Kakkar)

News Title :  Neha Kakkar husband Rohanpreet Singh big revelation about divorce

महत्वाच्या बातम्या-

‘या’ बड्या बँकेत झाला कोट्यवधीचा घोटाळा, तुमचं खातं तर नाही ना?

ऑक्टोबरमध्ये तब्बल ‘एवढ्या’ दिवस बॅंका राहणार बंद!

राज्यातील ‘या’ मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई!

नवरात्रीचे 9 दिवस ‘या’ 3 राशींसाठी ठरणार भाग्याचे!

बिग बॉस मराठी 5 च्या विजेत्याचं नाव समोर! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Join WhatsApp Group

Join Now