‘मला सगळं माहिती होतं पण….’ ऋषी कपूर यांच्या ‘वन नाईट स्टँड’बद्दल नीतू कपूर यांचा मोठा खुलासा

On: April 21, 2025 6:06 PM
Neetu Kapoor
---Advertisement---

Neetu Kapoor | दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) त्यांच्या दमदार अभिनयासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या खासगी आयुष्यासाठीही एकेकाळी चर्चेत असायचे. लग्नापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचे नाव जोडले गेले होते. नीतू कपूर (Neetu Kapoor) यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असे वाटत असतानाच, लग्नानंतरही ऋषी कपूर यांच्या कथित अफेअर्सबद्दल खुद्द नीतू कपूर यांनी एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता, जो आजही चर्चेत येतो.

नीतू कपूर यांचा मोठा खुलासा

एका जुन्या मुलाखतीत नीतू कपूर यांनी पती ऋषी कपूर यांच्या लग्नानंतरच्या वागणुकीबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. त्यांनी मान्य केले होते की, लग्नानंतरही ऋषी कपूर इतर महिलांसोबत फ्लर्ट करायचे. नीतू म्हणाल्या होत्या, ‘मला ऋषी कपूर यांच्या अफेअर्सबद्दल माहिती होती. अनेक महिलांसोबत फ्लर्ट करताना मी त्यांना पाहिले आहे. त्याचे अनेक अफेअर होते, पण ते फक्त वन नाईट स्टँड होते.’

नीतू यांनी पुढे सांगितले की, अनेक जण त्यांना ऋषी कपूर यांच्या अफेअर्सबद्दल सांगायचे आणि सुरुवातीला त्यांना याचे खूप वाईट वाटायचे. ‘त्यांच्या वन नाईट स्टँडने मी कंटाळली होती,’ असेही त्यांनी कबूल केले होते. मात्र, कालांतराने त्यांनी याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली.

नातं सांभाळतानाचा दृष्टिकोन

त्याच मुलाखतीत नीतू कपूर यांनी नातं टिकवण्यासाठी त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेबद्दल सांगितले. ‘मला हे देखील माहीत होतं की ते (ऋषी) माझ्याशिवाय राहू शकत नव्हते. त्यामुळे मी देखील विचार करणं सोडून दिलं होतं,’ असे त्या म्हणाल्या. पुरुषांना थोडे स्वातंत्र्य द्यायला हवे कारण काही गोष्टी त्यांच्या स्वभावात असतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले होते.

मात्र, त्यांनी आपली एक निश्चित लक्ष्मणरेषाही स्पष्ट केली होती. नीतू म्हणाल्या, ‘पण अन्य महिलेसोबत त्यांचं नातं फार पुढे गेलं असतं तर, मी त्यांना घराबाहेर काढलं असते.’ यावरून त्यांनी नात्यातील विश्वास आणि मर्यादेचे महत्त्व अधोरेखित केले होते. नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांना त्यांच्या २०२० मध्ये झालेल्या निधनापर्यंत खंबीर साथ दिली. पतीच्या निधनानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood) पुनरागमन केले असून, त्या आता आपली मुले रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रिद्धिमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahni) यांच्यासोबत आनंदी जीवन जगत आहेत.

Title : Neetu Kapoor Rishi Kapoor Affairs Old Interview

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now