Neena Gupta | चाळीसहून अधिक वर्षांपासून अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या नीना गुप्ता (Neena Gupta) या आजही वेब सीरिजच्या माध्यमातून चर्चेत असतात. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपली ठसा उमटवणाऱ्या नीना गुप्तांनी एकदा त्यांच्या पहिल्या किसिंग सीनचा अनुभव शेअर केला होता. या सीनपूर्वी त्या इतक्या घाबरलेल्या होत्या की, संपूर्ण रात्र त्यांना झोपच लागली नाही.
पहिल्या किसिंग सीनचा अनुभव आणि भीती
नीना गुप्तांनी (Neena Gupta) एका मुलाखतीदरम्यान दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं होतं की, त्या खूप वर्षांपूर्वी ‘दिल्लगी’ या टीव्ही शोमध्ये काम करत होत्या, ज्यात त्यांचा को-एक्टर दिलीप धवन (Dilip Dhawan) होता. त्या शोमध्ये भारतात पहिल्यांदाच लिप-टू-लिप किसिंग सीन दाखवला जाणार होता. “माझ्यासाठी हे खूप कठीण होतं कारण मी त्या व्यक्तीला नीट ओळखतही नव्हते. मी स्वतःलाच बजावलं की, तू अभिनेत्री आहेस आणि तुला हे करावंच लागेल,” असं त्यांनी सांगितलं.
View this post on Instagram
सीन झाल्यानंतर त्यांनी तात्काळ तिथून धावत जाऊन डेटॉलने तोंड धुतलं होतं. त्या पुढे म्हणाल्या, “मी संपूर्ण रात्र विचार करत होती, झोपच लागली नव्हती. मी किस कसा करणार याचं टेन्शन होतं. त्याकाळी स्क्रीनवर अशा प्रकारचं फिजिकल इंटीमेसी दाखवलं जात नव्हतं, पण टीआरपी वाढवण्यासाठी चॅनलने हा निर्णय घेतला.”
कुटुंबासमोर अस्वस्थता-
नीना गुप्ता (Neena Gupta) म्हणाल्या की, त्या काळात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून टीव्ही बघायचं. त्यामुळे अशा सीनवर लोकांचा प्रचंड विरोध झाला. “चॅनलचा हा प्लॅन काहीच कामाचा ठरला नाही. प्रेक्षकांनी या सीनवर आक्षेप घेतला आणि शेवटी चॅनलला तो सीन हटवावा लागला,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
त्या काळात अशा दृश्यांची प्रेक्षकांना सवय नव्हती. त्यामुळे ही कृती नव्हे तर धक्काच होता. नीना गुप्ता यांचा हा किसिंग सीन त्या शोमध्ये फक्त एकदाच दाखवण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला काढून टाकण्यात आलं. त्यांचे अनुभव ऐकून प्रेक्षकांना अभिनय मागची खरी दुनिया कळते आणि कलाकारांना किती आव्हानांचा सामना करावा लागतो याची कल्पना येते.






