“माझी छाती तिच्याएवढी…”, स्वतःच्या ब्रेस्टबद्दल नीना गुप्ता हे काय बोलून गेल्या?

On: April 16, 2025 1:10 PM
Neena Gupta
---Advertisement---

Neena Gupta | नीना गुप्ता (Neena Gupta) नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत असते. यावेळी ती एका जुन्या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. (Kapil Sharma Show) कपिल शर्मा शोमध्ये तिच्या वक्तव्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना हशा अनावर झाला, तर काहींनी थेट आपले कान झाकले.

कपिल शर्माच्या प्रश्नावर नीनाचं उत्तर

कपिल शर्माच्या शोमध्ये जेव्हा नीना गुप्ता पाहुणी म्हणून आली होती, तेव्हा त्याने तिला (Pamela Anderson) पामेला अँडरसनबाबत एक गंमतीदार अफवा विचारली. कपिलने सांगितले की अशी चर्चा होती की ‘बेवॉच’ या हॉलीवूड मालिकेत पामेलाची भूमिका नीना साकारणार होती. हे ऐकताच नीना गुप्ताने अतिशय धाडसाने आणि विनोदी पद्धतीने उत्तर दिलं.

नीना म्हणाली की, “माझी छाती तिच्यासारखी मोठी नाही.” तिच्या या उत्तरामुळे सेटवर हास्याचं वातावरण पसरलं. उपस्थित प्रेक्षक आणि सेलिब्रिटी मंडळींनाही तिच्या बोलण्यावर हसू आवरता आलं नाही. तिच्या बोलण्यातली सहजता आणि पारदर्शकता पुन्हा एकदा सर्वांनाच भावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

प्रेक्षक हसले, पण कपिलनं केली समजूत

नीनाच्या त्या विधानामुळे काही प्रेक्षकांनी आपल्या कानावर हात ठेवले. कपिल शर्माने तिच्या उत्तरावर थोडीशी गंमत करत म्हणाला की, “हे फॅमिली शो आहे आणि इथे अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात नाहीत.” यावर नीना गुप्ता देखील शांत बसली नाही. तिने कपिलला उलट विचारलं, “मग तू असा प्रश्न विचारतोसच का?”

नीनाच्या या टोमण्यानंतर पुन्हा एकदा वातावरण हलकंफुलकं झालं. कपिल शर्मा आणि नीना गुप्तामधील ही मजेशीर बोलचाल प्रेक्षकांना खूप भावली. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 Title: Neena gupta Bold Reply on Kapil Show

 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now