राष्ट्रवादीचा मोठा प्लॅन; आदित्य ठाकरेंविरोधात हा बडा नेता निवडणूक लढवणार?

On: August 22, 2024 1:33 PM
Aaditya Thackeray
---Advertisement---

Aaditya Thackeray | येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. महिन्याभरात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती विरूदध महाविकास आघाडी असा सामना राज्यभरात रंगणार आहे. अशातच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातही असाच सामना होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात हा नेता निवडणूक लढवणार?

वरळीतून महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे मैदानात असतील तर महायुतीकडूनही तगडा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. अशात वरळीतून राष्ट्रवादीचा नेते निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. वरळीतून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. वरळीत आदित्य ठाकरे विरूद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे.

वरळीत आदित्य ठाकरे विरूद्ध अमोल मिटकरी?

वरळीत अमोल मिटकरींना शुभेच्छा देणारे पोस्टर लागले आहेत. वरळीतील संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी यांना शुभेच्छा, असे पोस्टर वरळीत लागले आहेत. यामुळे वरळीत अमोल मिटकरी निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे.

2019 ला शिवसेनेकडून वरळीतून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली होती. आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश माने यांच्यात ही लढत झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांना कोण मारणार? भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक टोला

अंगावर येईल काटा! पुणे-नगर महामार्गावरील अपघातात एक जण ठार

मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेबद्दल धक्कादायक माहिती समोर

55 कोटी लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार मोठी आर्थिक मदत

Post Office ची जबरदस्त स्कीम; महिन्याला कमवा 20 हजारांपेक्षाही अधिक रुपये

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now