NCP Star Campaigners l विधानसभा निवडणुकीनंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी देखील जाहीर केली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं :
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून म्हणजेच 17 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 18 जानेवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी देखील होणार आहे.
याशिवाय उमेदवाराला 20 जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
NCP Star Campaigners l स्टार प्रचारकांची यादी :
अजित पवार
पार्थ पवार
सुनील तटकरे
प्रफुल्ल पटेल
ब्रीज मोहन श्रीवास्तव
सुबोध मोहिते
अविनाश अदिक
संजय प्रजापती
उमाशंकर यादव
धीरज शर्मा
चैतन्य मानकर
विरेंद्र सिंग
दिपाली अरोरा यांच्यासह आणखी काही बड्या नेत्यांचा समावेश आहे.
News Title : NCP Star Campaigners
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात सुसाट कंटेनरने तब्बल ‘इतक्या’ जणांना उडवले!
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली!
सैफवरील हल्ला पुर्वनियोजित कट?; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ






