अजितदादांना धक्का! पुण्यातील बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

On: May 14, 2025 9:51 AM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद अखेर उघडकीस आला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी अचानक राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला असून, त्या पत्रात त्यांनी पक्षातील अंतर्गत कारस्थानांवर बोट ठेवले आहे. (Deepak Mankar Resignation)

राजीनाम्याच्या पत्रात मानकर यांनी आपल्या विरोधात केलेले गुन्हे खोटे असल्याचा दावा केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की, “माझी बदनामी करून माझ्या राजकीय कारकीर्दीला नुकसान पोहोचवण्याचा डाव रचला जात आहे.” काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी जमिनीच्या व्यवहारात अपहार प्रकरणात दीपक मानकर (Deepak Mankar Resignation) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

“सत्यता पडताळल्याशिवाय गुन्हा दाखल” – मानकर यांचा आरोप :

दीपक मानकर यांनी लिहिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे की, “काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केल्याचा आरोप ठेवून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, सदर गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केली गेली.” (Deepak Mankar Resignation)

ते पुढे म्हणाले, “हा आर्थिक व्यवहार माझ्या वैयक्तिक जमिनीचा आहे आणि यात कोणतीही फसवणूक केली नाही. तरीही माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि त्याचा वापर राजकीय डावपेचांसाठी केला जात आहे.”

Pune News | कुकडे प्रकरणाचीही पार्श्वभूमी :

दीपक मानकर यांचे नाव अजित पवार गटाच्या अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे यांच्या बलात्कार प्रकरणाशीही जोडले गेले. पोलिसांनी तपासादरम्यान मानकर आणि कुकडे यांच्यात १ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी मानकर यांची चौकशी केली आणि त्यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

राजीनाम्यात दीपक मानकर यांनी लिहिले की, “या प्रकरणामुळे पक्षाची आणि माझीही नाहक बदनामी होत आहे. पक्षश्रेष्ठींना या आरोपांमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा कृपया मंजूर करावा.”

News Title: NCP Pune Chief Deepak Mankar Resigns, Writes to Ajit Pawar, Alleges Political Conspiracy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now