Gold and Silver Price | नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला मौल्यवान धातूंनी पुन्हा झळाळी घेतली आहे. पुणे, मुंबईसह देशभरातील सराफा बाजारात सोने-चांदीचे (Gold and Silver Price) भाव उंचावले असून, ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. वायदे बाजारातही या दोन्ही धातूंनी जोरदार उसळी घेतली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत आणखी किती महागाई वाढेल, हा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांसमोर उभा राहिला आहे.
सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर :
जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 2200 रुपयांची वाढ झाली आहे. एक तोळा सोने 1 लाख 16 हजार रुपयांवर पोहोचलं आहे. 22 सप्टेंबरला 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 92 रुपयांनी वाढला होता, तर आज 126 रुपयांनी वाढून तो 11,448 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,495 रुपये इतका झाला आहे.
IBJA नुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 1,12,160 रुपये, 23 कॅरेट 1,11,710 रुपये, तर 22 कॅरेट सोने 1,02,730 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय 18 कॅरेट सोने 84,120 रुपये आणि 14 कॅरेट सोने 65,610 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे.
Gold and Silver Price | चांदीची उसळी ग्राहकांना घाम फोडणारी :
सोन्यासोबतच चांदीनेही (Silver Rate) मोठी उसळी घेतली आहे. दोन दिवसांत चांदी 4,000 रुपयांनी महागली आहे. 22 सप्टेंबरला 3,000 रुपयांनी वाढ झाल्यानंतर आज सकाळच्या सत्रात आणखी 1,000 रुपयांची वाढ झाली. सध्या 1 किलो चांदीचा भाव 1,36,000 रुपयांवर पोहोचला आहे. IBJA नुसार दर 1,32,800 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. (Today Gold and Silver Price)
दरम्यान, सोन्या-चांदीच्या या झपाट्याने वाढलेल्या दरांमागे जागतिक आर्थिक घडामोडी कारणीभूत ठरत आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केल्यानं डॉलर आणि बाँडवर थेट परिणाम झाला आहे. गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळल्याने मागणी वाढली आहे. यामुळे पुरवठा आणि मागणीत असमतोल निर्माण होऊन भाव वधारले आहेत.






