Navra Majha Navsacha 2 | अभिनेते सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर स्टारर ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. 20 सप्टेंबररोजी हा चित्रपट रिलीज झाला आहे. तब्बल 20 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यातील एका भारुडाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या संदर्भातील व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. (Navra Majha Navsacha 2)
‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधवने सादर केलेल्या भारुडाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटात सिद्धार्थने एका राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना सिद्धार्थ गणरायाकडे साकडे घालताना दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडिओत ‘सत्ताधारी खासदारकी लाभली मला ..मुकूट घालीन 50 खोक्यांचा तुला…’ असं सिद्धार्थ गणरायाकडे नवस बोलतो. त्यावर मागून स्वप्नील जोशी ‘हे नवस बोलत आहेत की लाच देत आहेत…’ असा प्रश्न करताना दिसत आहे. (Navra Majha Navsacha 2) या भारूडाचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील लक्षवेधी भारुड
अरे देवा हो देवा.. धावा हो धावा.. देवा हो देवा गणपती देवा.. नवसाला पावा..
देवा जर का तू मला पावला.. सत्ताधारी खासदारकी लाभली मला.. मुकुट घालीन 50 खोक्याचा तुला
अरे देवा हो देवा.. धावा हो धावा.. देवा हो देवा गणपती देवा.. नवसाला पावा..
जनतेचं भलं कराया..( जनतेचं म्हणजे नक्की कुणाचं?.. म्हणजे साहेबांचं.. त्यांचा मुलगा, मुलगी, सासू-सासरे, मेव्हणा-मेव्हणी.. )
जनतेचं भलं कराया..विरोधी पक्ष फोडाया.. बुद्धी द्यावी गणराया..
देवा फटाके फुटू दे धड-धड ..ढोल-ताशे वाजू दे तड-तड..आमचा झेंडा फडकू दे फडफड.. (Navra Majha Navsacha 2)
News Title – Navra Majha Navsacha 2 bharud Video Viral
महत्त्वाच्या बातम्या-
तिरुपती बालाजी प्रसादाच्या लाडूत ‘या’ जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; राम मंदिरात वाटप
मुलीला कन्या दिनानिमित्त द्या हटके शुभेच्छा; होईल खुश
CIDCO ची घरे झाली स्वस्त, नवी मुंबईसाठी ‘या’ तारखेला निघणार लॉटरी
राज्यावर परतीच्या पावसापूर्वी मोठं संकट, IMD ने दिला महत्वाचा इशारा
मोठी बातमी! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक






