Bollywood News | बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचच्या (Casting Couch) धक्कादायक अनुभवांबद्दल अनेक अभिनेत्रींनी आवाज उठवला आहे. आता या यादीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेत्री नवीना बोले (Navina Bole) हिच्या नावाची भर पडली आहे. तिने प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानवर अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह मागणी केल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.
‘हे बेबी’ च्या ऑडिशनवेळी घडलेला प्रकार
अभिनेत्री नवीना बोलेने नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक साजिद खानसोबतच्या (Sajid Khan) भेटीचा कटू अनुभव सांगितला. काही वर्षांपूर्वी, साजिद खान त्याच्या ‘हे बेबी’ (Heyy Babyy) चित्रपटासाठी कलाकारांची निवड करत होता. त्याने नवीनाला ऑडिशनसाठी बोलावले होते. ठरलेल्या भेटीनुसार नवीना त्याच्या घरी पोहोचली असता, साजिदने तिच्यासमोर एक विचित्र अट ठेवली.
साजिदने नवीनाला तिचे कपडे काढून फक्त अंतर्वस्त्रांमध्ये (इनरवेअर) बसण्यास सांगितले. आपण तिच्या शरीरासोबत किती सहज (कंफर्टेबल) आहोत, हे पाहण्यासाठी ही मागणी करत असल्याचे कारण त्याने दिले. ‘सीआयडी’ (CID) सारख्या मालिकांमध्येही दिसलेल्या नवीनाने केलेल्या या आरोपामुळे चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Bollywood News | अभिनेत्रीचा निश्चय
नवीना बोले म्हणाली, “माझ्या आयुष्यात मी ज्या एका भयानक माणसाला पुन्हा कधीही भेटू इच्छित नाही, तो म्हणजे साजिद खान. महिलांचा अनादर करण्याच्या बाबतीत त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.” जेव्हा साजिदने तिला फोन केला तेव्हा ती उत्साहित होती, पण भेटीतील अनुभवाने ती हादरली.
‘इश्कबाज’ (Ishqbaaaz) फेम अभिनेत्रीने सांगितले की, साजिदच्या मागणीवर काय बोलावे हे तिला सुचत नव्हते. तेव्हा साजिदने तिला स्टेजवर बिकिनी (Bikini) घालण्याचा संदर्भ देत प्रश्न केला. नवीनाने त्याला सांगितले की, जर त्याला तेच पाहायचे असेल तर तिला घरी जाऊन बिकिनी घालून यावे लागेल, ती तिथे कपडे काढू शकत नाही. मोठ्या शिताफीने ती तिथून बाहेर पडली, पण त्यानंतरही साजिदने तिला अनेकदा फोन करून परत येण्याबद्दल विचारल्याचे नवीनाने सांगितले.
View this post on Instagram






