Navi Mumbai Traffic Update | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. यासाठी ते अंतरवाली सराटी येथून हजारो आंदोलक आणि शेकडो वाहनांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. हा मोर्चा पनवेल आणि वाशीमार्गे मुंबईकडे जाणार असल्याने नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत.
कोणत्या मार्गावर निर्बंध? :
नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार आंदोलकांच्या वाहनांना मार्ग देण्यासाठी काही रस्त्यांवर प्रवेशबंदी असेल. (Navi Mumbai Traffic Update)
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग : लोणावळा आणि खोपोलीहून येणाऱ्या आंदोलकांच्या वाहनांना पनवेल शहर व कळंबोली परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
इतर वाहनांसाठी प्रवेशबंदी : आंदोलकांची वाहने जात असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून कोनफाटा दिशेने तसेच बोर्ले टोलनाका ते पळस्पे फाटा महामार्गावर इतर वाहनांना बंदी असेल.
पळस्पे–गव्हाणफाटा मार्ग : पळस्पे फाटा ते डी पॉइंट जेएनपीटी मार्ग आंदोलकांच्या वाहनांसाठी वापरला जाणार असून, त्यावेळी अवजड वाहनांना पूर्ण बंदी असेल.
Navi Mumbai Traffic Update | पर्यायी मार्ग व सूट :
हलकी वाहने व दुचाकी – कळंबोली सर्कलमार्गे पनवेल-शीव महामार्ग किंवा खालापूर-खोपोली मार्गाचा वापर करावा.
आणीबाणीच्या सेवा – रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस आणि जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना या नियमांमधून सूट असेल. (Navi Mumbai Traffic Update)
नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोर्चा निघालेल्या वेळेत गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच, वाहतूक पोलीस दलाला सहकार्य करावे, जेणेकरून प्रवासात कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.






