मुंबई हादरली! आईने १० वर्षाच्या मुलीला ७० वर्षाच्या वृद्धाकडे पाठवलं, त्याने दारू पाजून रात्रभर….

On: November 1, 2025 1:28 PM
Navi Mumbai Crime
---Advertisement---

Navi Mumbai Crime | नवी मुंबई येथील तळोजा (Taloja) परिसरातून एक अत्यंत हादरवणारी आणि मानवी संवेदनांना बोट लावणारी घटना उघडकीस आली आहे. पैशाच्या लालसेपोटी एका आईनेच आपल्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा सौदा एका वृद्ध व्यक्तीसोबत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अमानुष कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे.

अडीच लाखांचा सौदा आणि आईचा क्रूरपणा :

ही संतापजनक घटना तळोजा फेज २ (Taloja Phase 2) परिसरातील कोपरा गावात (Kopra Village) घडली. नूरबी अन्सारी (Noorbi Ansari) असे आरोपी आईचे नाव आहे. तिने आपल्या १० वर्षांच्या मुलीला फारुख शेख (Farooq Sheikh) (वय ७०) नावाच्या वृद्धाकडे पैशांच्या बदल्यात पाठवले. फारुख शेख हा मूळचा लंडनचा (London) रहिवासी असून, सध्या तो तळोजा सेक्टर २० मधील एकता डेव्हलपर्सच्या (Ekta Developers) इमारतीत राहत होता.

नूरबी अन्सारी (Noorbi Ansari) हिने या ७० वर्षीय वृद्धाकडून अडीच लाख रुपये आणि घरातील महिन्याभराचे रेशन घेण्याचा सौदा केला होता. या बदल्यात तिने आपल्या पोटच्या मुलीला सलग दोन रात्रींसाठी फारुख शेखकडे पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तपास अधिकारीही संतप्त झाले.

Navi Mumbai Crime | अत्याचाराचे क्रूर वास्तव आणि पोलिसांची कारवाई :

पोलीस तपासात या गुन्ह्याची आणखी धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी फारुख शेख (Farooq Sheikh) हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी, तिला वेदना होऊ नयेत म्हणून मद्य पाजत असे. संतापजनक बाब म्हणजे, खुद्द आई नूरबी (Noorbi) रात्री मुलीला त्याच्या घरी सोडत असे आणि सकाळी तिला परत घेऊन जात असे.

नवी मुंबईच्या (Navi Mumbai) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला (Anti-Human Trafficking Unit) या घटनेची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे (Prithviraj Ghorpade) यांच्या पथकाने तात्काळ छापा टाकून पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपी आई नूरबी अन्सारी (Noorbi Ansari) आणि नराधम फारुख शेख (Farooq Sheikh) या दोघांनाही अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, आरोपींना फाशी देण्याची मागणी होत आहे.

News title : Navi Mumbai Crime: Mother Sells Daughter

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now