‘माझं आणि हार्दिकचं अजूनही…’; घटस्फोटानंतर नताशाकडून नवा खुलासा

On: November 10, 2024 2:22 PM
natasha stankovic
---Advertisement---

Natasa Stankovic | क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविक यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. त्यानंतर देखील यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत असताना दिसत असतात. सोशल मीडियावर दोघांची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. आपल्या चाहत्यासांठी दोघेही नवनवीन व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असतात. घटस्फोट दिल्यानंतर नताशा मुलाला कायमचं सर्बियाला घेऊन जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र यावर आता नताशाने मौन सोडलं असून तिने एक नवा खुलासा केला आहे.

काय म्हणाली नताशा?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना नताशा (Natasa Stankovic ) म्हणाली की, मी आणि मुलगा सर्बियाला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण मी परत कशी काय जाऊ? मला एक मुलगा आहे. तो मुलगा इथे शाळेत शिकतो. त्यामुळे माझं सर्बियाला जाणं शक्यच नाही. ते होणारच नाही.

मला वाटतंय मुलाने इथे राहणं गरजेचं आहे. अखेर त्याचं कुटुंबही इथेच आहे. आम्ही म्हणजे मी, हार्दिक आणि आगस्त्य अजूनही एक कुटुंब आहोत. आमचा एक मुलगा आहे आणि त्या मुलामुळे आम्ही एक कुटुंब आहोत. मला इथे दहा वर्षे झाली आहेत आणि दरवर्षी मी जुलै महिन्यात सर्बियाला जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @natasastankovic__

लोक वाईट नसतात-

पुढे नताशा (Natasa Stankovic) म्हणाली की, आयुष्यात काहीही घडलं तरी सुद्धा माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की लोक वाईट नसतात. फक्त त्यांचा आत्मा भरकटतो. मला असं वाटतं की मी स्वत:चं मूल्य विसरले होते. काही परिस्थितीत मी शांत बसायचे, मी फार काही बोलायचे नाही, मला फरक पडत नाही असं मी स्वत:ला म्हणायचे. पण अगस्त्यमुळे मी स्वत:वर प्रेम करायला शिकले.

कामाबद्दल बोलायचं झालं तर, नताशा म्हणाली की, मी पाच वर्षात काहीच काम केलं नाहीये. मात्र माझ्या आयुष्यात कोणतीच खंत नाहीये. मी काम करत राहिले असते तर माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी ते चांगलं राहिलं असतं, असं नताशाने सांगितलं. हार्दिकसोबतच्या नात्याबद्दलही खासगीपणा जपायला आवडेल, असंही ती म्हणाली.

News Title : Natasa Stankovic talks about hardik panday and family

महत्त्वाच्या बातम्या-

2025 पर्यंत ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा!

पुण्यात आमदाराच्या मुलाचं अपहरण, निर्वस्त्र करुन विवस्त्र महिलेसोबत फोटो काढले!

निलंग्यात रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा!

‘चंद्रकांत पाटलांसारख्या सुसंस्कृत व्यक्तीला निवडून द्या’; माजी मंत्री सुरेश प्रभूंचं कोथरूडकरांना आवाहन

‘या’ सुप्रसिद्ध सिंगरचा बाथरूममधला व्हिडीओ तूफान व्हायरल!

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now