एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले ‘ही माझी कमाई’

Narendra Modi | एनडीए आघाडीने 294 जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे. त्यामुळे, राजधानी दिल्लीत आज एनडीए आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीतील सर्वच घटकपक्षांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) तिसऱ्यांदा एनडीएच्या नेतेपदी म्हणून निवड करण्यात आली आहे.

नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदींनी भाषण केलं. यावेळी बोलताना हे अतूट नातं विश्वासाच्या आधारावर आहे. ही सर्वात मोठी कमाई आहे. त्यामुळेच हा क्षण माझ्यासाठी भावूक करणारा असल्याचं मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी झाले भावूक

देशासाठी पुढील 10 वर्षांचं लक्ष्य ठेवून काम करणार असल्याचे मोदींनी सांगितलं. तसेच, निवडणूक निकालावर भाष्य करताना इंडिया आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केला. EVM मशिन्सवरुन सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांनाही चिमटा काढला.

ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. त्यांनी दिवस पाहिला नाही. रात्र पाहिली नाही. प्रचंड उन्हात प्रत्येक दलाच्या कार्यकर्त्याने जे परिश्रम केले आहे, त्यांना मी मान झुकवून नमन करतो. माझं सौभाग्य आहे की, एनडीएचा नेता म्हणून तुम्ही सर्वांनी सर्व संमतीने मला निवडले. माझ्यावर नवीन जबाबदारी टाकली. त्यासाठी मी तुमचा प्रचंड आभारी आहे, असं ते म्हणालेत.

10 राज्यांपैकी 7 राज्यात एनडीए सेवा करत आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात आहोत. सर्वपंथ समभाव मानतो. गोवा असो, पूर्वेकडचा भाग असो, आपले ख्रिश्चन लोक राहतात. त्या ठिकाणीही आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे, असं मोदींनी सांगितलं.

Narendra Modi | EVM जिवंत आहे की मेलं- नरेंद्र मोदी

4 जूनला निकाल येत होते, तेव्हा मी कामात व्यस्त होतो. त्यावेळी मी कोणाला तरी विचारलं, आकडे वैगेरे ठीक आहेत. पण मला सांग, EVM जिवंत आहे की मेलं. कारण या लोकांनी आधीच ठरवलेलं भारताच्या लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे, म्हणून ईव्हीएमला शिव्या घातल होते. पण 4 जूनच्या संध्याकाळी त्यांना टाळी लागली. EVM ने त्यांना शांत केलं, असंही मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; नव्या दाव्याने खळबळ

“राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, थांबा बोलले तर थांबणार”

ठरलं! 9 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेणार शपथ

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! RBI ने घेतला मोठा निर्णय

सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना खुलं आव्हान, म्हणाल्या…