“आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा”

On: December 22, 2022 11:56 AM
---Advertisement---

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) अत्यंत गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.

सुशांत सिंह राजपूत केसचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का समोर येतं? दाल में जरूर कुछ काला है! आदित्य ठाकरे यांचा या केसशी संबंध आहे. त्यामुळे याची व्यवस्थित चौकशी व्हायला हवी, असं नितेश राणे म्हणालेत.

A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच, असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत केसबाबतही राहुल शेवाळे यांनी भाष्य केलंय. ड्रग्स संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला, सुशांत केस तपास माहिती जनतेला मिळायला हवी, असं शेवाळे म्हणालेत.

रिया चक्रवर्तीला जे कॉल आले होते ते AU यावरून आले होते, पण मुंबई पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही पण बिहार पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलाय, म्हणून हा प्रश्न मी उपस्थित केला, असं शेवाळे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now