Badlapur Crime Case l बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हेलावुन गेला आहे. बदलापुरातील या हृदयद्रावक घटनेमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अशातच आता हि धक्कादायक घटना सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनात आले आहे. या प्रकरणावरून आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जात आहे.
बदलापूरच्या घटनेमुळे उडाली सर्वत्र खळबळ :
बदलापूरच्या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. खऱ्या अर्थाने ही हृदयद्रावक घटना ही महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे. अशातच हे धक्कादायक प्रकरण दाबण्यासाठी सरकारने देखील प्रयत्न केला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात आले आहे. अशातच या प्रकरणातील शिक्षण संस्था ही भाजप पक्षाशी आणि संघाशी निगडित आहे, त्यामुळे भाजप आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.
बदलापूर अत्याराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र आक्षेप घेत त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली आहे.
Badlapur Crime Case l 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद राहणार? :
या धक्कादायक प्रकरणानंतर आता काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला या धक्कादायक घटनेत राजकारण करायचं नाही. मात्र, महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलीन करण्याचं काम दररोज राज्यात होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला, शाहू-फुले तसेच आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला अपमानित आणि काळ फासण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत.
याशिवाय या गंभीर प्रश्नावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये देखील चर्चा केली आहे, त्यामुळे येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिली आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटल आहे.
News Title : Nana Patole on Badlapur Crime Case
महत्त्वाच्या बातम्या-
पुढील काही दिवसात सोन्याच्या किंमतीत होणार प्रचंड वाढ; जाणून घ्या आजचे दर
बदलापूर आंदोलनप्रकरणी चित्रा वाघ यांचा खळबळजनक आरोप!
युवराज सिंगच आयुष्य उलगडणार मोठ्या पडद्यावर; कोणता अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका?
राज्यात पुन्हा पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
हुंदाई कंपनी टाटा सफारीला देणार टक्कर; होणार भन्नाट कार लाँच






