महाराष्ट्र हादरला! पुन्हा एका मुलीवर बलात्कार

On: August 24, 2024 1:40 PM
Pune News
---Advertisement---

Maharashtra Crime l महाराष्ट्रात दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. बदलापुर येथील दोन चिमुकल्यांवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच आता नालासोपार्‍यात 17 वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नालासोपाऱ्यात घडली धक्कादायक घटना :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी 17 वर्षीय पिडीत मुलीची मैत्रीण नालासोपारा येथे राहते. तिला भेटण्यासाठी ती कधीकधी नालासोपार्‍याला जात होती. तसेच त्या ठिकाणी मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्‍या तरुणाची तिची मागील आठवड्यात ओळख झाली होती.

मात्र गुरुवारी सोनू नामक या 25 वर्षीय तरूणाने तिला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार पीडित तरुणी नालासोपारा स्थानकात भेटायला गेली. यावेळी आरोपी सोबत त्याचा एक मित्र होता. त्यावेळी फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले आणि अवघ्या काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी त्यांनी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी त्या तरुणीवर बलात्कार केला.

Maharashtra Crime l पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक :

यानंतर पीडीत मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी तुळींज पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणातील दोन्ही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना अटक देखील केली आहे अशी माहिती तुळींज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली आहे.

या धक्कादायक घटनेनंतर आता तुळींज पोलीस पुढील तपस करत आहेत. तसेच याप्रकरणी आरोपीना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

News Title –  Nalasopara Girl Rape News

महत्त्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो सावधान! तब्बल ‘इतके’ दिवस जिल्ह्याला पावसाचा अलर्ट

“आरोपीला फाशी होईपर्यंत..”; भर पावसात सुप्रिया सुळे महायुती सरकारवर कडाडल्या

सोनं, चांदी झाली स्वस्त! जाणून घ्या आजचे दर

सतर्क! पुढील काही तासांत धो-धो बरसणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट

कोलकात्यात पुन्हा धक्कादायक घटना; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारच्या काचा फोडल्या अन् ..

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now