PCMC News | पिंपरी चिंचवड शहरात रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेली नकुल भोईर (Nakul Bhoir) यांच्या हत्येची घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. नकुल भोईर (Nakul Bhoir) हे स्थानिक स्तरावर ओळखले जाणारे समाजसेवक होते. समाजकार्यात आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांचे अनेकांशी चांगले संबंध होते. त्यांच्या पत्नीचे नाव चैताली भोईर असून ती देखील सामाजिक आणि राजकीय कार्यात रस घेत होती. काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
ओढणीने गळा आवळून केले ठार
नकुल भोईर (Nakul Bhoir) यांना त्यांच्या पत्नी चैताली भोईर यांच्या चारित्र्यावर संशय होता. काल रात्री, म्हणजेच गुरुवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात चैतालीने ओढणीने नकुलचा गळा आवळून ठार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. घटना घडल्यानंतर काही वेळातच चैतालीने स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. पोलिसांनी तिला अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे.
‘ती’ पोस्ट व्हायरल-
नकुल भोईर (Nakul Bhoir) हे त्यांच्या भागातील जनसंपर्कात सक्रिय होते आणि आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पत्नी चैतालीला नगरसेवक बनवण्याच्या तयारीत होते, अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराकडून मिळाली आहे. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी होते. त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमीही जोडली जात आहे. मात्र, प्राथमिक तपासानुसार हे प्रकरण पूर्णपणे वैयक्तिक आणि कौटुंबिक वादातून उभं राहिलेलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
कालच नकुल भोईर यांनी फेसबुक पोस्ट मध्ये भाऊबीजेच्या पोस्ट केली होती. त्यानंतर दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित दिवाळी सांज 2025 या कार्यक्रमाला नागरिकांचा मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार व्यक्त करणारी पोस्ट केली होती. या घटनेने भोईर कुटुंब, नातेवाईक आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस सध्या घटनामागील नेमकं कारण, चैतालीच्या मनःस्थितीचा तपास आणि घटनेच्या वेळी उपस्थित पुराव्यांची छाननी करत आहेत.






