नागपूर शहरातील पाणी पुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार

On: January 9, 2025 11:45 AM
Nagpur Water Cut
---Advertisement---

Nagpur Water Cut l नागपूरकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नागपूर महापालिकेने नागपूर शहरातील पाणी पुरवठ्या संदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे. नागपुर शहरातील पाणीपुरवठा उद्या म्हणजेच 10 जानेवारीला बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आजच पाणी साठवून ठेवावं लागणार आहे.

‘या’ ठिकणी पाणीपुरवठा होणार नाही :

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे निम्म्या नागपूर शहरात 10 जानेवारीला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कारण उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते शनिवारी 11 जानेवारी दुपारी 4 पर्यंत कन्हान जलशुद्धीकरणाचे काम सुरू असणार आहे. तसेच यावेळी तब्बल 30 तासांचे शटडाऊन असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

नागपूर महापालिका आणि ॲारेंज सीटी वॅाटरच्या दुरुस्तीच्या कामासाठी 30 तासांसाठी हे शटडाऊन करण्यात आले आहे. त्यानुसार नागपूर शहरातील 33 जलकुंभावरुन होणार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय सर्व दुरुस्ती होईपर्यंत सतरंजीपुरा, लकडगंज, आशिनगर, नेहरूनगर या झोनमधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Nagpur Water Cut l नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना केलं आवाहन :

दरम्यान, लकडगंज झोनमध्ये सुभांननगर, भांडेवाडी, भरतवाडा, कळमना, बाबुळबन पारडी 1 आणि 2, मिनीमातानगर, लकडगंज 1 आणि 2 हे जलकुंभ असल्याने या सर्व ठिकाणी 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच या सर्व जलकुंभावरून अनेक वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र आता तो सर्व पाणी पुरवठा काही दिवसांसाठी खंडित राहणार आहे.

याशिवाय सतरंजीपुरा झोनमध्ये वांजरी, विठोबा भावेनगर, शांतीनगर हे जलकुंभ येतात. मात्र या ठिकाणाहून जवळपास 50 वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. तसेच नेहरूनगर झोनमध्ये नंदनवन 1 आणि 2, नंदनवन जुने, ताजबाग, खरबी हे जलकुंभ आहेत. मात्र या जलकुंभावरून सुद्धा अनेक वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र आता हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वापरण्यासाठी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

News Title : Nagpur Water Cut News

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील ‘या’ भागाला अवकाळी पावसाचा इशारा!

“धनंजय मुंडे यांच्या नोकराने जमीन हडपली”; महिलेच्या नव्या आरोपांनी खळबळ

चार्जिंगचं टेन्शन विसरा, आता बिनधास्त घ्या ई-कार; सरकारची मोठी घोषणा

बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पात्रता फेरीतील धक्कादायक प्रकार उघडकीस

 

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now