Vande Bharat Express l देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु झाल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना सर्व सोयी सुविधा उपल्बध करून दिल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अशातच आता महाराष्ट्रातील एक वंदे भारत एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत एक्सप्रेस बंद होणार :
देशातील सर्वात आधुनिक ट्रेन म्हणून वंदे भारत या ट्रेनचं नाव घेतलं जातं. कारण या ट्रेनचा वेग आणि या ट्रेनमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमुळे ही ट्रेन प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नवीन वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला आहे. मात्र आता महाराष्ट्रातील सिंकदराबाद ते नागपूर ही ट्रेन बंद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कारण नागपूर ते सिंकदराबाद मार्गावरील वंदे भारत ट्रेनमधील तब्बल 80 टक्के खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी असल्याने फक्त 20 टक्के क्षमतेनं ही ट्रेन धावत आहे. त्यामुळे या ट्रेनचे अनेक डब्बे हे रिकामेच असतात.
Vande Bharat Express l ट्रेनच्या डब्यांची संख्या कमी करण्यात येणार :
नागपूर ते सिंकदराबाद ही वंदे भारत एक्सप्रेस 22 ऑगस्ट रोजी या वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण 1440 सीट होत्या. मात्र त्यापैकी 1200 सीट या रिकाम्याच होत्या. याच ट्रेनच्या 2 एक्झिक्युटीव्ह डब्ब्यांमधील देखील 88 सीटपैकी केवळ 10 सीट रिझर्व्ह होत्या. म्हणजेच या डब्ब्यांमधील तब्बल 78 सीट रिकाम्याच होत्या.
त्यामुळे सिकंदराबाद-नागपूर या वंदे भारत एक्सप्रेसला कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच या मार्गावरील ही ट्रेन बंद होण्याची दाट शक्यता आहे. नागपूर ते सिंकदराबाद ही वंदे भारत ट्रेन अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आली आहे.
मात्र प्रवाशांची संख्या कमी असल्याने आधी या ट्रेनच्या डब्यांची संख्या कमी करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या या ट्रेनला एकूण 20 डब्बे आहेत. मात्र कमी प्रतिसाद राहिल्यास ही संख्या तब्ब्ल 8 पर्यंत कमी केली जाईल असं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
News Title – Nagpur to sikandarabad vande bharat express close
महत्वाच्या बातम्या-
तीन कार लाँच! दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा भन्नाट फीचर्ससह ‘या’ कार
चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! एमएस धोनीचे चाहते हैराण
‘या’ आजाराने वाढवलंय नागरिकांचं टेन्शन! अशी घ्या स्वतःची काळजी
बिग बॉसकडून सूरज चव्हाणवर अन्याय; आता थेट…
अभिनेता गोविंदाच्या हेल्थबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर!






