नागपूरकरांना मिळणार नवा उड्डाणपुल! जाणून घ्या उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये आणि नावकरण

On: September 11, 2025 11:34 AM
Nashik Traffic Plan
---Advertisement---

Nagpur Flyover | उड्डाणपुलांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरला आणखी एक आधुनिक उड्डाणपूल लाभला आहे. अमरावती महामार्गावर बोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस गेट दरम्यानचा 2.85 किलोमीटर लांबीचा नवा उड्डाणपूल पूर्णत्वास आला आहे. लवकरच या पुलाचे लोकार्पण होणार असून प्रवाशांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. (Bole Chowk University Gate Bridge)

अमरावती मार्गावर दररोज हजारो वाहने धावत असतात. सध्या लॉ कॉलेज चौक, रवी नगर चौक, भरतनगर चौक आणि फुटाळा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नव्या उड्डाणपुलाच्या वापरामुळे या ठिकाणी होणारा ताण कमी होईल आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.

अमरावतीकडे जाणाऱ्यांसाठी मोठा दिलासा :

नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा पूल मोठा दिलासा ठरणार आहे. वाडी आणि पुढे अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्यांना आता शहरातील गर्दी टाळून जलद प्रवास करता येईल. त्यामुळे केवळ वेळच नाही तर इंधनाचीही बचत होणार आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे, कारण गर्दीमुळे होणारे वायूप्रदूषण कमी होईल.

या प्रकल्पामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील ट्रॅफिकचा भार लक्षणीय प्रमाणात कमी होईल. वाढत्या लोकसंख्येला आणि शहरातील वाहन संख्येला तोंड देण्यासाठी या उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा दबाव कमी करण्यास मदत होईल.

Nagpur Flyover | उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये आणि नावकरण :

हा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुमारे 191 कोटी रुपयांचा खर्च करून उभारला आहे. चार लेनचा हा पूल 2.85 किलोमीटर लांबीचा असून ‘नागपूर-अमरावती महामार्ग ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम’अंतर्गत बांधण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या उड्डाणपुलाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून हा पूल नागपूरकरांना समर्पित केला जाणार आहे. (Nagpur Flyover)

नागपूरच्या पायाभूत सुविधांना बळ :

गेल्या काही वर्षांत नागपूरमध्ये उड्डाणपुलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मेट्रो प्रकल्प, नागपूर बाह्य वळण रस्ता आणि ‘नवीन नागपूर’ प्रकल्प या पायाभूत योजनांमुळे शहराच्या विकासाला वेग आला आहे. याचाच भाग म्हणून हडको आणि एनएमआरडीएमध्ये 11,300 कोटींचा निधी करार झाला आहे. यातून नागपूरच्या भूसंपादनासह बाह्य वळण रस्ता आणि इतर प्रकल्पांना गती मिळणार आहे. (Bole Chowk University Gate Bridge)

या नव्या उड्डाणपुलामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. लवकरच होणाऱ्या लोकार्पणानंतर हा पूल नागपूरकरांच्या सेवेत उपलब्ध होईल आणि शहराच्या वाहतुकीच्या चित्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल.

News Title: Nagpur Flyover News | New 2.85 Km Bridge from Bole Chowk to University Gate to Ease Traffic

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now