‘नागार्जुन आमच्या घरी आले होते तेव्हा श्रीदेवी…’; बोनी कपूर यांचा मोठा गौप्यस्फोट

On: April 17, 2025 4:18 PM
Boney Kapoor
---Advertisement---

Nagarjuna | दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या मृत्यूबाबत त्यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. याचवेळी त्यांनी अभिनेता नागार्जुन (Nagarjuna) यांनी सांगितलेल्या एका आठवणीचा उल्लेख केला, ज्यातून श्रीदेवी क्रॅश डाएटमुळे (Crash Diet) पूर्वीही गंभीर प्रसंगातून गेल्याचे समोर आले आहे.

नागार्जुनने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

बोनी कपूर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, श्रीदेवीच्या निधनानंतर (post Sridevi’s death) सांत्वनासाठी नागार्जुन घरी आले होते. त्यावेळी त्यांनी एक जुनी आठवण सांगितली. श्रीदेवी त्यांच्यासोबत एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्या अत्यंत कडक क्रॅश डाएटवर होत्या.

याच डाएटिंगमुळे श्रीदेवींना चक्कर आली आणि त्या बाथरूममध्ये कोसळल्या होत्या. इतकेच नाही, तर या घटनेत त्यांचा दातही तुटला (broke her tooth) होता, असे नागार्जुन यांनी सांगितल्याचे बोनी कपूर म्हणाले. यावरून श्रीदेवी यांना डाएटिंगमुळे चक्कर येण्याचा त्रास पूर्वीपासूनच असल्याचे स्पष्ट होते.

डाएटिंगची सवय आणि आरोग्याकडे दुर्लक्ष

बोनी कपूर यांनी पुढे सांगितले की, श्रीदेवी ‘स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी’ अनेकदा उपाशी राहायची आणि आहारातून मीठ पूर्णपणे टाळायची. लग्नापासूनच तिला कमी रक्तदाबामुळे (Low Blood Pressure) अनेकदा चक्कर येत असे. डॉक्टरांनी तिला याबाबत सावधही केले होते, पण तिने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.

याच आरोग्याच्या समस्या आणि डाएटिंगच्या सवयींमुळे २०१८ मध्ये दुबईतील (Dubai) हॉटेलमध्ये तिचा बाथटबमध्ये बुडून अपघाती मृत्यू (Accidental Death) झाला असावा, असे संकेत बोनी कपूर यांच्या बोलण्यातून मिळतात. दुबई पोलिसांनी चौकशीअंती त्यांना क्लीन चिट दिली होती आणि मृत्यू अपघाती असल्याचे स्पष्ट केले होते.

Title : Nagarjuna Recalled Sridevi Fainting, Breaking Tooth Due to Crash Diet: Boney Kapoor

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now