अमित शाहांच्या वक्तव्याने वाद, आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन

On: December 19, 2024 1:17 PM
MVA Agitation against amit shah
---Advertisement---

MVA Agitation | देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद हे संपूर्ण देशभरात उमटले आहेत. कॉँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या मुद्दावर भाजपाला चांगलेच वेढले आहे. आज संसदेत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निळ्या रंगाचे कपडे घालून आले. राहुल गांधींनी आज निळ्या रंगाचा टीशर्ट घातला तर प्रियंका गांधी यांनी निळ्या रंगाची साडी नेसली आहे. (MVA Agitation )

अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निळ्या रंगाचे कपडे घालून संसदेत दाखल झाले. दिल्लीतल्या संसद अधिवेशनासोबतच महाराष्ट्रातल्या नागपूर अधिवेशनातही निळे वादळ दिसून आले. आज (19 डिसेंबर)विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले. यावेळी घटनेकरता सामील व्हा अशा घोषणाही देण्यात आल्या.

महाविकास आघाडीचे आंदोलन

या आंदोलनात तिन्ही पक्षांचे आमदार सहभागी झाले होते. निळ्या टोप्या, निळी उपरणी आणि हातात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन आंदोलन करण्यात आले. नाना पटोले, जयंत पाटील व आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांचा या आनंदोलनात सहभाग होता. भाजपाचं चरित्र देशासमोर आलं आहे. भाजपाला संविधान संपवायचं आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे हे दिसून आलं आहे, असं नाना पटोले म्हणाले. (MVA Agitation )

तर आदित्य ठाकरे म्हणाले की, अपमान हा फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा नाही तर संपूर्ण देशाचा झाला आहे. माझा सवाल आहे की रामदास आठवले हे भाजपासह राहणार आहेत का? चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे भाजपासह राहणार आहेत का ते त्यांनी सांगावं. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनेक आमदार भाजपात किंवा त्यांच्या बरोबर आहेत ते राजीनामा देणार आहेत का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय.

नेमकं काय म्हणाले होते अमित शाह?

राज्यसभेत अमित शाह यांनी सोमवारी एक वक्तव्य केलं होतं. आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झाली आहे. आंबेडकर-आंबेडकर असा जप करण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर पुण्य मिळालं असतं, असं अमित शाह म्हणाले होते.त्यांच्या या वक्तव्याचा आता देशभर निषेध केला जातोय. (MVA Agitation )

News Title – MVA Agitation against amit shah

महत्त्वाच्या बातम्या-

“वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये…”; आमदार क्षीरसागर कडाडले

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

31 ची पार्टी करा आलीशान क्रूझवर, IRCTC चे स्पेशल ‘क्रूझ टूर पॅकेज’कसं बुक कराल?

जम्मू-काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली!

स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? घटनेचा व्हिडिओ समोर

Join WhatsApp Group

Join Now