पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

On: January 15, 2025 12:15 PM
Mutual Fund
---Advertisement---

Mutual Fund l म्युच्युअल फंड्स आणि डीमॅट अकाउंट्सच्या नॉमिनीशी संबंधित सेबीने अनेक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. यामुळे जर गुंतवणूकदार आजारी पडल्यास किंवा त्याचा मृत्यु झाला तर या गोष्टींचा उपयोग नवीन नियमानुसार होणार आहे. मात्र आता हे नियम काय आहेत हे आपण पाहुयात…

काय आहेत नियम?

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार गुंतवणूकदाराला नॉमिनी घोषित करणे गरजेचे आहे. कारण आता ही महत्वाची बाब गुंतवणूकदाराच्या पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर्सकडून केली जाऊ शकत नाही. त्यामुळे नॉमिनी एक किंवा अन्य नॉमिनीजसह जॉइंट अकाउंट होल्डर्स म्हणून राहू शकतात किंवा आपल्या संबंधित हिश्श्यासाठी वेगवेगळी सिंगल अकाउंट्स अथवा फोलिओ उघडू शकतात.

दरम्यान, क्लेम न केलेल्या असेट्सची संख्या कमी करणे आणि गुंतवणुकीच्या व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं सेबीने म्हंटल आहे. तसेच आता नॉमिनेशन फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतींनी जमा करता येणार आहे.

Mutual Fund l नॉमिनीला असेट्स ट्रान्स्फर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? :

– गुंतवणूकदाराच्या डेथ सर्टिफिकेटची सेल्फ-अटेस्टेड कॉपी
– नॉमिनीचं केवायसी अपडेटेड असणे आणि त्याची पुन्हा खात्री केलेली असणे गरजेचे आहे.
– क्रेडिटर्सचा ड्यू डिस्चार्ज

नव्या नियमांनुसार, गुंतवणूदारांना आपल्या नॉमिनीविषयी अधिक माहिती द्यावी लागणार आहे. त्यामध्ये ओळख पटवणाऱ्या तपशीलांचा समावेश असणार आहे. जसे की, नॉमिनीचे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर किंवा आधार क्रमांक. याशिवाय गुंतवणूकदारांना नॉमिनीचे वैयक्तिक माहिती द्यावी लागेल आणि ते आपल्याशी कशा प्रकारे संबंधित आहेत याची माहिती द्यावी लागणार आहे.

News Title :  mutual fund rule change

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

मकोका लागताच वाल्मिक कराडचा आणखी एक धक्कादायक मॅटर समोर!

अजित दादांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का?, बीडमध्ये मोठ्या घडामोडी

वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीत तणावपूर्ण शांतता, आता पुढील कारवाई काय?

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, ‘असा’ असणार संपूर्ण दौरा!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now