‘वेलकम’ फेम अभिनेत्याचं एअरपोर्टवरून अपहरण!, सिनेइंडस्ट्रीत एकच खळबळ

On: December 11, 2024 12:17 PM
Mushtaq Khan was kidnapped
---Advertisement---

Mushtaq Khan | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ यांचा ‘वेलकम’ हा चित्रपट अजूनही चाहत्यांच्या स्मरणात आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. अशात या चित्रपटातील एका अभिनेत्याचे अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे सिनेइंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते मुश्ताक खान (Mushtaq Khan) यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुश्ताक खान यांचं अपहरण करून त्यांना तब्बल 12 तास टॉर्चर केलं गेल्याचे देखील समोर येतंय. खंडणीसाठी हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलंय. या प्रकरणानंतर अभिनेत्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. मुश्ताक खान यांचे बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी सांगितले की, ही घटना 20 नोव्हेंबर रोजी घडली होती. या दिवशी मुश्ताक खान एका कार्यक्रमात जाणार होते. यासाठी त्यांना ऍडव्हान्स पैसे देखील देण्यात आले होते. सोबतच विमानाची तिकीट देखील देण्यात आली होती. मात्र जसे ते दिल्ली विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना (Mushtaq Khan) अचानक एका गाडीत बसवण्यात आलं आणि मेरठला घेऊन जाण्याऐवजी त्यांचं अपहरण करण्यात आलं.

मुश्ताक खान यांचे अपहरण

मुश्ताक खान यांना अपहरण करून बिजनोर येथे नेण्यात आलं होतं. याच ठिकाणी मुस्ताक खान यांना 12 तास बांधून ठेवण्यात आलं होतं. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेते मुश्ताक खान यांच्याकडे अपहरणकर्त्यांनी तब्बल एक कोटींची खंडणी देखील मागितली होती. मात्र त्यांची दोन्ही मुलं असं करण्यास असमर्थ ठरले तेव्हा त्यांच्या मुलांना 2 लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगण्यात आले.

2 लाख रुपये दिल्यानंतरच अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खान यांची सुटका केली. याप्रकरणी अभिनेत्याने बिजनोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी त्यांच्याकडे सर्व पुरावे देखील आहेत. विमानाचे तिकीट ते बँक ट्रान्सफरचे स्टेटमेंट हे सगळे पुरावे त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये दाखवले आहेत. या सर्व घडलेल्या प्रकरणामुळे मुश्ताक खान (Mushtaq Khan) यांना मोठा धक्का बसला.

मुश्ताक खान यांचे चित्रपट

दोनच दिवसांपूर्वी अभिनेते कॉमेडियन सुनील पाल यांचे देखील अपहरण करून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर मुश्ताक खान यांच्यासोबत घडलेले प्रकरण समोर आले आहे. या लागोपाठ झालेल्या घटनांमुळे कलाकारांच्या सुरक्षतेवर देखील प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत.  दरम्यान, अभिनेते मुश्ताक खान यांच्या सिनेकारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी ‘वेलकम’ या चित्रपटात साकारलेली भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यांचा हॉकी स्टिक चा डायलॉग हा अत्यंत लोकप्रिय झाला होता.  नुकतेच ते ‘स्त्री-2’  चित्रपटात देखील दिसून आले होते.

News Title –  Mushtaq Khan was kidnapped

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेसेनेला घरचा आहेर; थेट म्हणाले…

‘पुष्पा 2’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला मिळालं इतक्या कोटींचं मानधन!

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात रक्त गोठवणारी थंडी, शाळांच्या वेळात मोठा बदल

मंत्रीपदासाठी इच्छुक व नाराजांसाठी एकनाथ शिंदे वापरणार ‘हा’ पॅटर्न?, चर्चेला उधाण

“माझं डोकं पिसाळलं तर…”; मनोज जरांगे संतापले, पण कुणावर?

Join WhatsApp Group

Join Now